MNS | मुंबई : भारतीय नोटांवर लक्ष्मी आणि गणपतीचे फोटो आणावे. लक्ष्मीपूजन करत असताना आपल्या मनात हा विचार आला, असं केजरीवाल यांनी म्हटलंय. व्यापारीही लक्ष्मी आणि गणेशाची मूर्ती ठेवतात असा दाखला त्यांनी दिला. नोटेच्या दुसऱ्या बाजूला गणपती आणि लक्ष्मीचा फोटो छापावा, अशी मागणी केजरीवाल यांनी मोदी सरकारकडे केली. यानंतर आता मनसे आमदार राजू पाटील यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली.
26 ऑक्टोबरला दिवाळी पाडव्याच्या सकाळी केजरीवाल यांनी ही मागणी केली. मात्र, गुजरात निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केजरीवाल हिंदुत्ववादी कार्ड खेळण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांच्यावर भाजपकडून करण्यात आलाय. राजकीय वर्तुळातून यावर प्रतिक्रिया उमटत असताना मनसेची भूमिका काय आहे याबाबत प्रश्न विचारले जात होते. यावर राजू पाटलांनी भाष्य केले.
आमदार राजू पाटील यांनी ट्विट करत मनसेची भूमिका स्पष्ट केली आहे. पायाभूत सुविधांवर भर देण्याची विनंती राजू पाटील यांनी केली आहे. सध्याचं राजकारण पाहून जनता NOTA वापरायच्या मुडमध्ये आहे. त्यामुळे महागाई कमी करा. शेतकरी बांधवांना दिलासा द्या. रस्ते चांगले करा. चांगली शिक्षण व आरोग्य व्यवस्था उभी करा. रूपया मजबूत करा. उगीचच कशाला त्या नोटा आणि फोटोंच्या मागे लागलाय? सामान्यांना याचा काय फायदा? फालतू राजकारण, असं राजू पाटील यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय.
महत्वाच्या बातम्या :
- Big Boss Marathi | बिग बॉस मराठी 4 मध्ये अमृता फडणवीसांची एन्ट्री
- Skin Care Tips | ‘या’ घरगुती गोष्टी वापरून चेहऱ्यावर आणा चमक
- Supriya Sule | “हे सरकार असंवेदनशील, ओला दुष्काळ जाहीर करा” ; सुप्रिया सुळे संतापल्या
- Houseboat Destination | भारतामध्ये ‘हे’ आहेत परफेक्ट हाऊसबोट डेस्टिनेशन
- IND vs NED T20 World Cup | भुवनेश्वरने 12 चेंडूत 1 धावही दिली नाही! फलंदाज कोमात, केला नवा विक्रम