राज्य सरकारचे मोठे धोरण; सोयाबीन, कापसाचे उत्पादन वाढणार!
मराठवाडा : खरीप हंगामात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. या पाश्वर्भूमीवर राज्य सरकारने खरीप हंगामातील मुख्य पीक असलेल्या सोयाबीन आणि कापसाचे उत्पादन वाढीबरोबरच काढणी पश्चात त्याचे नुकसान कसे टाळता येईल यासाठी धोरण ठरवले आहे. याबाबद कृषी अधिकाऱ्यांची बैठक कृषिमंत्री दादा भुसे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली असून धोरण ठरविण्यात आले आहे.
नुकसान होण्यापूर्वीच उपाययोजना राबविण्यासाठी सरकारकडून विशेष प्रयत्न होणार आहे. यामध्ये आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधा आणि धोके ओळखून ते टाळण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. सोयाबीन हे खात्रीचे पिक मानले जाते. त्यामुळे नुकसान टाळण्यासाठी विकास आराखडा तयार करून धोका टाळण्याचा प्रयत्न मूल्यसाखळीच्या आधारे केला जाणार आहे.
तसेच शेतकऱ्यांना बिजोत्पादन, प्रक्रिया धारकांना योग्य मालाचा पुरवठा ही जबाबदारी कंपन्यांची राहणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान टळणार आहे.
महत्वाच्या बातम्या –