मोठी बातमी : विराट कोहली कर्णधारपद सोडण्याच्या तयारीत

virat kohali

नवी दिल्ली- आगामी T20 विश्वचषक स्पर्धेनंतर भारतीय संघात मोठे फेरबदल होण्याची शक्यता असून कर्णधार विराट कोहली कर्णधार पदावरून पायउतार होणार असल्याचे समजत आहे. तसेच कोहलीच्या जागी मुंबईकर रोहित शर्मा भारताचा एकदिवसीय आणि T20 चा कर्णधार होऊ शकतो अशी चर्चा सुरु झाली आहे.

या विषयावर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विराट कोहली स्वत: हा निर्णय घेण्याची शक्यता आहे. जगातील सर्वश्रेष्ठ बॅट्समन होण्यासाठी विराटला पुन्हा एकदा त्याच्या बॅटींगवर अधिक फोकस करण्याची इच्छा आहे. तर दुसऱ्या बाजूला रोहित शर्माच्या कॅप्टनसीमध्ये मुंबई इंडियन्सनं पाचवेळा आयपीएल स्पर्धेचं विजेतेपद पटकावले आहे त्यामुळे कर्णधार पदाची धुरा त्याच्याकडे सोपवली जाऊ शकते अशी शक्यता आहे.

दरम्यान, भारताचा न्यूझीलंडकडून इंग्लंडमधील जागतिक कसोटी अजिंक्य पद स्पर्धेच्या (डब्ल्यूटीसी) अंतिम सामन्यात पराभव झाल्यापासून बीसीसीआयचे अधिकारी या विषयावर चर्चा करत आहेत. हे अधिकारी भारतीय कर्णधाराच्या संघ निवडीवर नाखूष होते.

या सामन्यात कोहलीने वेगवान गोलंदाजांना अनुकूल असणाऱ्या खेळपट्टीवर दोन फिरकीपटू खेळवले. कोहलीच्या कर्णधारपदाबद्दल बीसीसीआय खूप चिंतित आहे. तो आयसीसी स्पर्धांमध्ये कर्णधार म्हणून अपयशी ठरला आहे. डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यानंतर जुलैमध्ये बीसीसीआय पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत असे दिसून आले, की बीसीसीआयचे अनेक अधिकारी कोहलीच्या कर्णधारपदावर असमाधानी आहेत.

महत्वाच्या बातम्या :