मोठी बातमी! आज होणारा आरसीबी विरुद्ध केकेआर संघाचा सामना पुढे ढकलला

अहमदाबाद : भारतात सध्या कोरोनाच्या सावटाखाली आयपीएल स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेशी संबधीत एक मोठी बातमी समोर आली आहे. सोमवारी ३ मे रोजी होणारा बेंगळुरु रॉयल चॅलेंजर आणि कोलकाता नाइट रायडर्स या संघादरम्यान होणारा सामना पुढे ढकलण्यात आला आहे.

अहमदाबाद येथे २०२१ आयपीएल स्पर्धेचा ३०वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या दोन संघादरम्यान होणार होता. सांयकाळी ७.३० वाजता या सामन्याला सुरुवात होणार होती. मात्र हा सामना सुरु होण्यापुर्वी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. केकेआरच्या संघातील दोन भारतीय तर एका विदेशी खेळाडूची कोरोना चाचणी ही पॉझिटीव्ह आल्याने आजचा सामना हा पुढे ढकलण्यात आला आहे.

तसेच सपोर्ट स्टाफमधील काही कर्मचारीही आजारी असल्याने संपुर्ण संघ आयसोलेट झाला असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र याबाबत आयपीएल आणि केकेआरकडून कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. या दोन्ही संघात स्पर्धेत झालेल्या आधिच्या सामन्यात केकेआरचा आरसीबीने ३८ धावांनी पराभव केला होता. आजच्या सामन्यात केकेआरचा संघ बदला घेण्यासाठी मैदानात उतरणार होता. मात्र सामन्याआधी कोरोनाने केकेआरला गाठले.

महत्वाच्या बातम्या