मोठी बातमी : दिल्लीत पकडलेल्या दहशतवाद्यांच्या म्होरक्याला मुंबईतून अटक

mumbai

मुंबई : भारतावरचा मोठा घातपात आज दिल्ली पोलिसांच्या सतर्कतेमुळे टळला असल्याचे पहायला मिळत आहे. देशभरात सण आणि उत्सवाचे वातावरण असताना दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने 6 जणांना अटक केली आहे. यातील दोन जण हे पाकिस्तानी प्रशिक्षित दहशतवादी असल्याची माहिती समोर आली आहे.

दिल्ली पोलीस तसे एटीएसने देशातील विविध भागातून एकूण सहा जणांना अटक केले आहे. यामध्ये माहाराष्ट्रात राहणाऱ्या एकाला राजस्थानमधील कोटा येथून ताब्यात घेण्यात आलं आहे. तर दोघांना दिली तेसच तीन जणांना उत्तर प्रदेशातून अटक करण्यात आली आहे. या संशयितांच्या टार्गेटवर महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश तसेच दिल्लीमधील काही ठिकाणं होती.

महाराष्ट्रातून ज्या दहशतवाद्याला अटक करण्यात आली होती, तो मुंबईतील असल्याची माहिती समोर आली आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने ही कारवाई केली होती. गेल्या महिन्याभरापासून हे ऑपरेशन सुरू होतं. 6 दहशतवाद्यांपैकी मुंबईतून एका जणाला अटक करण्यात आली होती. जान मोहम्मद शेख उर्फ समिर कालिया उर्फ अली मोहम्मद शेख असं या दहशतवाद्याचं नाव आहे. तो सायन भागात राहणार आहे.

तसेच जान शेख हा मुख्य सुत्रधार असल्याचं समोर आलं आहे. हाच जान शेख अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ अनिस इब्राहिमच्या संपर्कात होता. एवढंच नाहीतर जान शेख 2 पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या संपर्कात होता. दिल्ली पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर इतर पाच जणांना अटक करण्यात आली असल्याची माहिती सध्या मिळत आहे.

महत्त्वाच्या बातम्या