मुंबई : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर १६ जानेवारीपासून देशभरात लसीकरणाला सुरुवात झाली आहे. या लसीकरणामुळे देशवासियांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. सीरम इन्स्टिट्यूट आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाने संयुक्तरित्या निर्माण केलेली ‘कोव्हिशील्ड’ आणि भारत बायोटेकची ‘कोव्हॅक्सिन’ या दोन लस पहिल्या टप्प्यात कोरोनायोद्ध्यांना दिल्या जात आहेत.
या लशींवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व मंत्री नवाब मलिक यांच्यासह आमदार अमोल मिटकरी यांनी संशय व्यक्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिला लस घ्यावी असं आव्हान दिलं होतं. दरम्यान, या लसी सुरक्षित असल्याचं तज्ञांसह पंतप्रधान मोदी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील सांगितलं असून अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलं आहे.
राज्यात देखील लसीकरण मोठ्या प्रमाणावर पार पडत असून राष्ट्रवादीच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. त्यांनी लसीकरणाविषयी मुख्यमंत्री ठाकरेंकडे महत्वाची मागणी केली आहे. दिव्यांग व्यक्ती, ज्येष्ठ नागरीकांना लसीकरणासाठी प्राधान्य देण्याबाबत सकारात्मक विचार करावा, अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली आहे. त्यांनी या पत्राद्वारे राज्यातील कोरोनाकाळातील परिस्थिती कुशलपणे हाताळल्याबद्दल ठाकरे यांचे पत्र लिहून अभिनंदन देखील केले आहे.
सुप्रिया सुळे यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र –
कोरोना विषाणूने धुमाकूळ घातल्याने देशाच्या आणि राज्याच्या आरोग्य यंत्रणेवर ताण आला होता. अशा परिस्थितीत तुमच्या नेतृत्वाखाली राज्याच्या आरोग्य यंत्रणेने अतिशय उल्लेखनीय काम करून देशासमोर आदर्श निर्माण केला आहे. त्यासाठी तुमचे, मंत्रिमंडळाचे अभिनंदन.
कोरोनाशी आजही आपण लढत आहोत. आता कोरोनावरील लस उपलब्ध झाली आहे. त्यामुळे तुम्हाला नम्र विनंती आहे की, लशीकरणाला सुरुवात करताना ती गरजू घटकांपर्यंत पोहोचावी, यासाठी दिव्यांग व्यक्ती, ज्येष्ठ नागरीकांना लसीकरणासाठी प्राधान्य देण्याबाबत सकारात्मक विचार करावा.
आता कोरोनावरील लस उपलब्ध झाली आहे. त्यामुळे @CMOMaharashtra आपणास नम्र विनंती आहे की,लशीकरणाला सुरुवात करताना ती गरजू घटकांपर्यंत पोहोचावी,यासाठी दिव्यांग व्यक्ती, ज्येष्ठ नागरीकांना लसीकरणासाठी प्राधान्य देण्याबाबत सकारात्मक विचार करावा.@OfficeofUT @AjitPawarSpeaks
— Supriya Sule (@supriya_sule) January 19, 2021
महत्वाच्या बातम्या
- कृषी कायद्यांविरोधात खुद्द शरद पवार उतरणार मैदानात !
- ‘उद्धव ठाकरे फार छान कार चालवतात, मात्र… ‘ फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला
- ‘स्वतःला जाणते नेते समजणारे महाराष्ट्राच्या राजकीय नकाशावर दिसणार नाहीत’
- पटोले प्रदेशाध्यक्ष झाले तर विधानसभा अध्यक्षपदी कोण? काँग्रेसमध्ये खलबतं सुरू, वरपुडकरांचेही नाव चर्चेत
- भारतीय संघाचा पाया विराटने रचला, तर रहाणेने कळस चढवला – रवी शास्त्री