मोठी बातमी : आता ‘या’ जिल्ह्यात उद्यापासून कडक लॉकडाऊन

सातारा : राज्यासह देशभरात पुन्हा एकदा कोरोना संसर्गाने थैमान घातला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत राज्यातील स्थिती गंभीर झाली असून रुग्णालयांमध्ये बेड्स, ऑक्सिजन, औषधांचा तुटवडा निर्माण झाला असून आरोग्य व्यवस्थेवर देखील मोठा ताण निर्माण झाला आहे. राज्यात १५ मे लॉकडाऊन लागू करण्यात आला असून अत्यावश्यक सेवांसह जीवनावश्यक (किराणा, भाजीपाला आदी) वस्तूंच्या खरेदी साठी ठराविक काळात सूट देण्यात आली आहे.

दरम्यान, परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी आता राज्यातील विविध भागांमध्ये स्थानिक प्रशासन कठोर निर्णय घेत आहे. सातारा जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढत आहेत. गेल्या तीन दिवासात 2500 पेक्षा जास्त कोरोना रुग्ण वाढत आहेत. यामुळं लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी, पोलीस प्रशासन, सीईओ यांच्याशी चर्चा केल्यानंतर लॉकडाऊन अधिक कडक करण्याच्या सूचना दिल्याची माहिती साताऱ्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

त्यानुसार आता सातारा जिल्ह्यात उद्यापासून कडक लॉकडाऊन लागू करण्यात येणार आहे. औषधाची दुकाने वगळता सातारा जिल्ह्यातील सर्व दुकाने बंद राहतील. शेती अवजारे आणि इतर किराणा घरपोच देण्यासाठी परवानगी. तर, अनावश्यक बाहेर पडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे सातारा उपजिल्हाधिकारी यांनी आदेश दिले आहेत.

जाणून घ्या नियमावली –

उद्या सकाळी ७ वाजल्यापासून १० मे रात्री १२ वाजेपर्यंत हे कठोर निर्बंध लागू राहणार आहेत.

सर्व किराणा माल, भाजीपाला दुकाने, फळ विक्रेते, डेअरी, बेकरी, मिठाई इत्यादी सर्व प्रकारची खाद्य पदार्थ दुकाने (कोंबडी, मटण, पोल्ट्री, मासे आणि अंडी यांसह), पाळीव प्राण्यांच्या खाद्य पदार्थांची दुकाने, पावसाळ्याच्या हंगामात व्यक्तींसाठी तसेच संस्थांसाठी संबंधित असणाऱ्या साहित्याच्या उत्पादनाशी निगडीत दुकाने पूर्णपणे बंद राहणार. मात्र, तर या सर्वांचा घरपोच पुरवठा करण्यास सकाळी 7.00 ते सकाळी 11.00 या वेळात परवानगी देण्यात आली आहे.

कृषी अवजारे आणि शेतातील उत्पादनांशी संबंधित दुकाने सकाळी 7.00 ते सकाळी 11.00 या वेळेतच सुरु राहतील. तर घरपोच सेवा सकाळी 7.00 ते सायंकाळी 5.00 या वेळेत सुरु ठेवण्यास परवानगी.

हॉटेल, रेस्टॉरंट यांची घरपोच पार्सल सेवा दुपारी 12.00 ते रात्री 8.00 वाजेपर्यतच सुरू राहणार.

दुपारी 12.00 ते सायंकाळी 05.00 घरपोच दारु विक्री सुरु राहणार. याचसोबत पूर्वीचे नियम देखील लागू राहणार आहेत.

 

महत्त्वाच्या बातम्या