मोठी बातमी: मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यासाठी राज्य सरकारची सर्वोच्च न्यायालयात याचिका

uddhav thakrey maratha arakshan

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर मराठा समाज आता आक्रमक होत आहे. राज्यातील विविध जिल्ह्यात आंदोलने केली जात असून ही स्थगिती उठवण्यासाठी राज्य सरकारने योग्य ती पाऊले उचलावे अशी मागणी केली जात आहे.

राज्यात सद्या मराठा आरक्षणावरून राजकारण तापलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा अरक्षणास स्थगिती दिल्यामुळं राज्यातील मराठा समाज आक्रमक झाला असून त्यास नेत्यांनी देखील पाठिंबा दिला आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाला दिलेली स्थगिती उठवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यामुळे आता मराठा समाजाला काहीसा दिलासा मिळाला असला तरी आरक्षण कायम होणे महत्वाचे आहे.

राज्य सरकारकडून दिलेल्या माहितीनुसार, मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेली अंतरिम स्थगिती उठविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात मोठया खंडपीठाकडे शासनाच्या वतीने आज 21 सप्टेंबर 2020 रोजी विनंती अर्ज दाखल करण्यात आला आहे. या याचिकेत काही मुद्दे मांडण्यात आले आहेत. यासंदर्भात टीव्ही ९ने वृत्त दिले आहे.

“अंतरिम स्थगिती उठवण्यासाठी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायलयाने विनंती अर्ज दाखल केला आहे. स्थगिती निरस्त करण्यासाठी अर्ज दाखल करणं ही प्रक्रिया आहे. यावर पुढे सुनावणी होईल. आज एक टप्पा पुढे गेलो आहोत. उद्या किंवा परवा मुख्यमंत्री याबाबत सविस्तर भूमिका पत्रकार परिषद घेऊन मांडतील,” असे मराठा आरक्षण उपसमितीचे प्रमुख आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी बैठकीनंतर सांगितले.

महत्वाच्या बातम्या :