मोठी बातमी : समाजसेवक डॉ. प्रकाश बाबा आमटे यांना कोरोनाची लागण

corona

नागपूर : राज्यात जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. मात्र पुणे, अमरावती, यवतमाळ, औरंगाबाद, ठाणे या शहरांमध्ये कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढतोय. त्यामुळे पुन्हा एकदा चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. देशातील प्रमुख शहरांमध्ये कोरोनाने पुन्हा उसळी घेत आहे.

डॉ. प्रकाश आमटे हे महारोगी सेवा समितीच्या लोक बिरादरी प्रकल्पाचं काम पाहातात. गेल्या काही दिवसांपासून डॉ. प्रकाश आमटे यांना ताप होता. त्यांची RTPCR चाचणी निगेटीव्ह आली होती. पण तब्येतीत सुधारणा होत नसल्यानं त्यांची कोरोनाची चाचणी करण्यात आली. त्याची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे.

डॉ. प्रकाश आमटे यांना पुढील उपचारासाठी हॉस्पीटलमध्ये दाखल करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. त्यानुसार आमटे यांना नागपुरातील हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आनंदवन, लोकबिरादारी प्रकल्प आणि सोमनाथ प्रकल्प पुढील काही दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कोरोनानंतर शहारातील माणसांनी जीवनशैली बदलण्याची गरज असल्याचं मत डॉ. प्रकाश आमटे यांनी एका कार्यक्रमात म्हटलं होतं. “कोरोना कधी संपेल माहीत नाही. मास्क हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक झाला आहे. सोशल डिस्टन्सिंंग हा शब्द चुकीचा आहे. आपण फिजिकल डिस्टन्सिंंग पाळले पाहिजे. दुर्दैवाने आपण ते अजिबात पाळत नाही”, अशी खंत देखील डॉ. प्रकाश आमटे यांनी व्यक्त केली होती.

महत्त्वाच्या बातम्या