मुंबई : लॉकडाऊनंतर आता राज्यात राजकीय रंग जोर धरु लागला आहे. तोंडावर असलेल्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादीकडे तुलनेने महत्त्वाची पदं आहेत. त्यामुळे आता काँग्रेसनेही उपमुख्यमंत्रिपदामध्ये रस दाखवल्याचं सांगण्यात येत आहे.
महाविकास आघाडीच्या वर्षपूर्तीनंतर आता नव्या पदांची नियुक्ती होत आहे. त्यातच राज्यात आणखी एक उपमुख्यमंत्रिपद तयार होण्याची शक्यता आहे. सध्या राष्ट्रवादीकडे उपमुख्यमंत्रिपद असताना, दुसरं उपमुख्यमंत्रिपद काँग्रेसला देण्याची तयारी सुरु आहे. त्यासाठी शिवसेना अनुकूल आहे. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले हे जर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाले, तर त्यांच्या जागी शिवसेनेच्या नेत्याची वर्णी लागू शकते. त्याबदलत्यात काँग्रेसला उपमुख्यमंत्रिपद हवं आहे. अशी माहिती समोर येत आहेत.
काँग्रेसमध्ये सध्या प्रदेशाध्यक्ष निवडीची चर्चा जोर धरत आहे. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या दिल्लीवाऱ्या वाढल्या आहेत. नाना पटोले यांनी प्रदेशाध्यक्षपदावर दावा केला आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्षपद रिक्त होऊ शकतो. हे पद काँग्रेसने शिवसेनेला देण्यास अनुकूलता दर्शवली आहे. मात्र त्याबदल्यात काँग्रेसनेही उपमुख्यमंत्रिपदावर दावा सांगितला आहे.
दरम्यान, काँग्रेसच्या या प्रस्तावाला शिवसेनेनेही अनुकूलता दर्शवल्याचं सांगण्यात येत आहे. जर शिवसेनेला विधानसभा अध्यक्षपद मिळणार असेल, तर सेनेसाठी ते फायद्याचं ठरणार आहे. विधानसभा अध्यक्षपद घ्या आणि उपमुख्यमंत्रिपद द्या अशी काँग्रेसची भूमिका आहे. त्यामुळे आता भविष्यात महाराष्ट्राच्या राजकारणात कोणत्या आणि कशा हालचाली होतायेत हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- ग्रेटा थनबर्गने डिलीट केलेल्या ट्विटमध्ये होते तरी काय ?
- खडसेंची अटक टळणार का ? ; आज होणार सुनावणी
- ऑलिम्पिकची तयारी सुरू; जपानमध्ये मात्र स्पर्धेलाला विरोध !
- राहुल गांधींच्या ‘त्या’ प्रश्नावर भाजपने काढला राहुल यांचा खापर पणजोबा!
- ट्रॅक्टर रॅलीत दगावलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी प्रियंका गांधी रवाना