#मोठी बातमी : शरद पवारांनी घेतली राज्यपालांची भेट, पटेलांनी दिले यावर स्पष्टीकरण…

Sharad pawar

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राजभवनावर राजकीय नेत्यांची वर्दळ वाढली असल्याचं पाहिला मिळत आहे. सताधारी आणि विरोधका सतत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेत आहेत. त्यात आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार देखील आज राजभवनावर राज्यपालांची भेटी घेण्यासाठी दाखल झाले.

असे सांगितले जात आहे की, खुद्द राज्यपालांनी शरद पवारांना भेट घेण्यासाठी बोलावले होते. या विनंतीला मान देऊन पवार राजभवनावर दाखल झाले. या भेटीवेळी प्रफुल्ल पटेल देखील उपस्थित होते. ही सदिच्छा भेट होती, असे पटेल म्हणाले. मात्र पवारांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आले.

तर कोश्यारी, पवार आणि पटेल यांच्यामध्ये सुमारे अर्धा तास चर्चा झाली. कोश्यारींनी चहासाठी बोलावलं होतं. ही केवळ सदिच्छा भेट होती, भेटीमागे राजकीय निष्कर्ष काढण्याची गरज नाही, कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, अशी माहिती प्रफुल्ल पटेल यांनी राजभवनातून निघताना दिली.

अलीकडेच शिवसेना खा. संजय राऊत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या भेटीला गेले होते. यावेळी संजय राऊतांनी देखील सदिच्छा भेट घेतली असल्याचं स्पष्टीकरण दिले. तर राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्यात पिता पुत्रांचे स्नेह असल्याचं ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

कोरोना को हाराना है ये हमारा ब्रिद, आज आई है मुस्लीम समाज की ईद : आठवलेंच्या कवितेतून शुभेच्छा

हे आहेत खरे हिरो ! मुळचे नगरचे मात्र तेलंगणात कार्यरत असलेले IPS भागवतांनी केले मोठे कार्य

… तर मग आता परप्रांतीयांना आमची परवानगी घ्यावी लागेल, CM योगींना राज ठाकरेंचा दणका !