मुंबई : भांडुपमधील शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या मैत्री या बंगल्यावर सकाळी साडेसात वाजल्यापासून ईडीची कारवाई सुरू होती. 10 अधिकाऱ्यांच्या पथकाने राऊत आणि त्यांचे आमदार भाऊ सुनील राऊत यांच्या खोल्यांची झडती घेतली. पथकाने राऊतांच्या कुटुंबियांची देखील चौकशी केली. तर एका टीमने त्यांचा दादरमधील फ्लॅट सील केला आहे. संजय राऊत यांनी पत्रा चाळ जमीन घोटाळ्याच्या पैशातून हाच फ्लॅट खरेदी केल्याचा आरोप आहे. दरम्यान ईडी कडून संजय राऊतांना अटक करण्यात आली. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला हा मोठा झटका मानला जात आहे.
महाराष्ट्रातील 1034 कोटी रुपयांच्या पत्रा चाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी ईडीने संजय राऊत यांना ताब्यात घेतले. राऊत तपासात सहकार्य करत नसल्याने त्यांना ईडी कार्यालयात नेण्यात आले आहे. ईडी कार्यालयात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. राऊत यांना ईडीने 27 जुलै रोजी समन्स बजावले होते. तरी ते अधिकाऱ्यांसमोर हजर झाले नाहीत.
संजय राऊत यांनी तपासात सहकार्य न केल्याचा आरोप
महाराष्ट्रातील 1000 कोटींहून अधिक रकमेच्या पत्रा चाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी ईडीने संजय राऊत यांची चौकशी केली. 1 जुलै रोजी संजय राऊत ईडीसमोर हजर झाले होते. ईडीने त्यांना 20 जुलै आणि 27 जुलै रोजी पुन्हा चौकशीसाठी बोलावले होते. मात्र, राऊत ईडी कार्यालयात पोहोचले नाहीत. त्यामुळे त्याच्यावर तपासात सहकार्य न केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. दरम्यान ईडीचे पथकाने राऊत यांना ताब्यात घेतले आहे.
काय आहे पत्रा चाळ घोटाळा?
हे प्रकरण मुंबईतील गोरेगाव परिसरातील पत्रा चाळशी संबंधित आहे. हा महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाचा भूखंड आहे. सुमारे 1034 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणात संजय राऊत यांची 9 कोटी आणि राऊत यांची पत्नी वर्षा यांची 2 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. रिअल इस्टेट व्यावसायिक प्रवीण राऊत यांनी पत्रा चाळमध्ये राहणाऱ्या लोकांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. एका बांधकाम कंपनीला या भूखंडावर 3000 फ्लॅट बांधण्याचे काम मिळाले. त्यापैकी 672 सदनिका पूर्वीपासून येथे राहणाऱ्या रहिवाशांना देण्यात येणार होत्या. उर्वरित रक्कम म्हाडा आणि त्या कंपनीला द्यायची होती, परंतु 2011 मध्ये या मोठ्या भूखंडाचा काही भाग अन्य बिल्डरांना विकण्यात आला.
महत्वाच्या बातम्या :
- Nilesh Rane on Sanjay Raut | संजय राऊतांची पुढची मुलाखत जेलमध्ये जेलरसोबत ; निलेश राणेंचा टोला
- Yashomati Thakur | शिंदे गटात गेलेल्यांना वॉशिंग पावडरमध्ये स्वच्छ केले का? – यशोमती ठाकूर
- Sanjay Raut ED Inquiry | संजय राऊतांच्या अटकेवर एकनाथ शिंदे यांचे मोठे वक्तव्य! म्हणाले…
- Ajit Pawar | संजय राऊत यांच्या ईडी कारवाईवर विरोधी पक्षनेते अजित पवार यांची प्रतिक्रिया
- Navneet Rana | “संजय राऊतांना अटक होणार” ; ईडी कारवाईवर नवनीत राणा यांची प्रतिक्रिया!
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<