मोठी बातमी : सायना नेहवालचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह; थायलंड ओपन स्पर्धेला मुकणार

nehwal

नवी दिल्ली : भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याची बातमी समोर आली आहे. व तिला हॉस्पिटलमध्ये क्वारंटाईन होण्यास सांगण्यात आले आहे. थायलंड ओपन २०२१ या स्पर्धेसाठी भारतीय खेळाडू सज्ज झाले आहेत. पण, स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी भारताला मोठा धक्का बसला आहे. सायना नेहवालचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती समोर येत आहे.

तसेच केवळ सायनाचाच नाही तर भारताचा बॅडमिंटनपटू एचएस प्रणॉय याचा देखील कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असल्याचे वृत्त समोर येत आहे. या दोघांनाही बँकॉक येथील स्थानिक रुग्णालयात पुढीत चाचणी आणि उपचारासाठी घेऊन जाण्यात आल्याचेही समजते. त्याचबरोबर सायनाचा पती आणि बॅडमिंटनपटू परुपल्ली कश्यप याला देखील क्वारंटाईन होण्यास सांगितले.

त्याच्याही चाचण्या करण्यासाठी त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यात आले आहे. कारण तो सायनाच्या संपर्कात अधिक काळ होता. तरी अजून कश्यपचा रिपोर्ट येणे बाकी आहे. सायना मागील काही महिने दुखापतीमुळे त्रस्त होती. त्यानंतर तिने पुन्हा बॅडमिंटन कोर्टवर पुनरागमन केले होते. पण आता तिचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असल्याने थायलंड ओपन खेळता येणार नाही.

महत्वाच्या बातम्या