मोठी बातमी! राज कुंद्रा यांना मुंबई पोलिसाकडुन अटक

मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती आणि बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रा यांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. फ्रेब्रुवारी महिन्यात मुंबई पोलिसांकडे त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. याच प्रकरणात राज कुंद्राला १९ जुलै रोजी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.

फेब्रुवारी २०२१मध्ये राज कुंद्रा विरोधात मुंबई पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती. अश्लिल व्हिडीओ चित्रीत करुन तो समाजमाध्यमावर प्रसिद्ध करण्याचा प्रकार समोर आला होता. याच प्रकरणात प्राथमीक तपासणीत राज कुंद्रा यांचे नाव समोर आले. याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या हाती पुरवे लागल्यानंतर त्यांनी राज कुंद्रा यांना अटक केली. राज कुंद्राच्या अटकेने उद्योगजगत आणि मनोरंजन क्षेत्रात मोठीच खळबळ उडाली आहे.

यापुर्वीही त्याच्यावर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती. मार्च २०२० मध्ये मुंबई येथे राहणारे सचिन जोशी यांनी त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. सतयुग गोल्ड प्रायव्हेट लिमिटेड कंपनीशी संबंधित आर्थीक व्यवहारावरून ही तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र यामुळे राज कुंद्राची पत्नी शिल्पा शेट्टीचा आगामी चित्रपट ‘हंगामा २’ अडचणीत येण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP