fbpx

मोठी बातमी : बारावीच्या निकालामध्ये पुन्हा एकदा मुलींचा डंका

टीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्र राज्यातील इयत्ता बारावीचा निकाल आज जाहीर होणार आहे, दुपारी एक वाजता हा निकाल तुम्ही ऑनलाईन पाहू शकता. तत्पूर्वी पत्रकार परिषदेत राज्यात निकालामध्ये मुलींनी पुन्हा एकदा बाजी मारली आहे, असं स्पष्ट करण्यात आले आहे.

यंदा कोकण विभागाचा निकाल हा सर्वात जास्त आहे तर नागपूर विभागाचा निकाल हा सगळ्यात कमी आहे. मुलींचा निकाल हा मुलांच्या निकालापेक्षा ७.४५ टक्क्यांनी जास्त आहे.

विभागनिहाय निकाल

  • पुणे – 87.88 टक्के
  • मुंबई – 83.85 टक्के
  • नागपूर – 82.81 टक्के
  • अमरावती – 87 टक्के
  • लातूर – 86.08 टक्के
  • नाशिक – 84.77 टक्के
  • औरंगाबाद – 87.29 टक्के
  • कोल्हापूर – 87.12 टक्के
  • कोकण – 93.23टक्के

खालील वेबसाईट उपलब्ध असणार बारावीचा निकाल

– mahresult.nic.in

– results.maharashtraeducation.com

– examresults.net

– indiaresults.com

– mahahsscboard