मोठी बातमी : पुणेकरांसाठी नवी नियमावली, जाणून घ्या काय सुरु, काय बंद?

pune

पुणे : राज्यात पुन्हा एकदा कोरोना रोगाने थैमान घातला आहे. यामुळे आरोग्य सेवा देखील अपुऱ्या पडत असून हे संकट पुन्हा एकदा गडद होत असल्याचं चित्र निर्माण होत आहे. यामुळे महाराष्ट्रात १४ एप्रिल रात्री आठ वाजल्यापासून ते १ मे सकाळी ७ वाजेपर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. राज्यात १४४ कलम म्हणजेच संचारबंदी लागू करण्यात आली असून अतिमहत्वाचे व अत्यावश्यक सेवा वगळता नागरिकांना बाहेर फिरता येणार नाही, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. तर शनिवारी आणि रविवारी कडक लॉकडाऊन असणार आहे.

कोरोना प्रतिबंधक नियम लागू केलेले असूनसुद्धा येथे रोज हजारोंच्या संख्येने नवे रुग्ण आढळत आहेत. नव्या रुग्णांचे प्रमाण वाढल्यामुळे येथे आरोग्य यंत्रणा अपुरी पडू लागली आहे. या पार्श्वभूमीवर पुणे प्रशासनाने नवे नियम जारी केले आहेत.

वीकेंड लॉकडाऊन दरम्यान अत्यावश्यक सेवेतील दुकानं बंद राहणार
पुणे जिल्ह्यातील वाढती कोरोना रुग्णांची परिस्थिती पाहता वीकेंड लॉकडाऊन दरम्यान अत्यावश्यक सेवेतील दुकानं बंद राहतील, अशी माहिती पुण्याचे सह. पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी दिली आहे. पुण्यात आता शनिवार आणि रविवारी फक्त मेडिकलची दुकान सुरु ठेवण्यास परवानगी आहे.

चष्माचे दुकाने राहणार सुरु
संचारबंदीच्या काळात मेडिकल, रुग्णालये वगळता इतर बहुतांश बाबींवर बंदी आणण्यात आली होती. यामध्ये चष्म्याची दुकानंसुद्धा बंद करण्यात आली होती. मात्र आता पालिकेच्या नव्या नियमांनुसार चष्याची दुकानं सोमवारी ते शुक्रवार सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत सुरू ठेवता येणार आहेत. या नव्या नियमांमुळे दृष्टीदोष असलेल्यांना दिलासा मिळाला आहे.

खानावळींना पार्सल सेवा देण्यास मुभा
पुण्यात खानावळींना पार्सल सेवेसाठी परवानगी देण्यात आली आहे. खानावळी आठवड्यातील सर्व दिवस सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत पार्सल सेवा देऊ शकतात.

मद्यविक्रीला होम डिलिव्हरी अटीवर परवानगी
पुणे पालिकेने मद्य विक्री करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, फक्त होम डिलिव्हरी करण्याच्या अटीवर ही परवानगी देण्यात आली आहे. नव्या नियमानुसार आता सोमवारी ते शुक्रवार सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मद्य विकण्यास मुभा असेल.

महत्वाच्या बातम्या

IMP