मुंबई : गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. गेल्या २४ तासांमध्ये देशात १७ हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर गेल्या २४ तासांमध्ये २९ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. देशामध्ये नवीन कोरोना रुग्णसंख्येने एक लाखाचा आकडा पार केला आहे. सध्या देशामध्ये १ लाख ०९ हजार ५६८ सक्रिय रुग्ण आहेत.
गेल्या २४ तासांमध्ये २९ कोरोना रुग्णांनी जीव गमावला आहे. देशात आतापर्यंत पाच लाखापेक्षा जास्त लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर गेल्या २४ तासांमध्ये सक्रिय रुग्णांमध्ये २ हजार ३७९ ची वाढ झाली आहे.
मास्क वापरण्याचे आवाहन –
कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता आता सर्वांना मास्क वापरण्याचे आवाहन केले जात आहे. सार्वजनिक ठिकाणी नागरिकांनी काळजी घ्यावी. कोरोनापासून लांब राहण्यासाठी आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यावर देखील भर देणे महत्वाचे आहे.
महत्वाच्या बातम्या :
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<