मोठी बातमी : आमदार मुक्ता टिळक यांना कोरोनाची लागणी

blank

पुणे : कोरोनाने जगभर थैमान घातलं आहे. पुण्यात देखील दिवसेंदिवस कोरोंच्या रुग्णात कमालीची वाढ होत आहे. अशात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. भारतीय जनता पक्षाच्या कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक यांनाही करोनाची लागण झाली आहे.

महाजॉब्स पोर्टलची सुरुवात करून महाराष्ट्राने मोठी झेप घेतली – मुख्यमंत्री

टिळक यांच्यासह त्यांच्या आईलाही करोनाची बाधा झाली आहे. आमदार टिळक यांच्या वडीलांचे मागील आठवडयात निधन झाले होते. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी त्यांच्या कुटूंबातील सर्वांची करोना चाचणी करण्यात आली होती. त्यात, आमदार मुक्ता टिळक आणि त्यांच्या आईला करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. स्वत: मुक्ता टिळक यांनी ट्विटरवर वरून याबाबत माहिती दिली आहे.

तर दुसऱ्या बाजूला पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्याचे भाजपचे आमदार राहुल कुल यांना देखील कोरोनाची लागण झाल्‍याचे समोर आले आहे. राहुल कुल यांनी स्वतः याबाबत आपल्या अधिकृत फेसबुक पेजवरून ही माहिती दिली आहे.

दरम्‍यान, आमदार राहुल कुल यांच्या कुटुबियांची देखील तपासणी करण्यात आली आहे. यात सर्व कुटुंबियांचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्याची असल्याची माहिती राहुल कुल यांनी दिली आहे.

तर दुसरीकडे पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी देखील कोरोनाची लागण झाली झाली असून पुण्यातील दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मोहोळ यांच्या कुटुंबातील ८ जणांना देखील कोरोना झाल्याचे उघड झाले आहे.

यंदाचा गणेशोत्सव “आरोग्योत्सव” म्हणून साजरा करू, महापौरांचे नागपुरकरांना आवाहन

माजी महापौर आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बड्या नेत्या वैशाली बनकर यांच्या कुटुंबात देखील ९ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पुण्यात आता राजकीय क्षेत्रात कोरोनाने विळखा अधिक घट्ट केल्याने शहरवासीयांच्या चिंतेत अजूनच भर पडली आहे.