मोठी बातमी: मंत्री अशोक चव्हाण राज्यपालांच्या भेटीला, तर सोनिया गांधी यांची देखील काँग्रेस नेते घेणार भेट!

Ashok chavhan and rajyapal

मुंबई: भाजपाने वर्तवलेले भाकीत खरे होणार? तीनचाकी सरकार आपापल्यातच भांडून पडणार? काँग्रेस नेत्यांची नाराजी भाजपाच्या सुगीचे दिवस आणणार? अशा अनेक राजकीय वर्तुळातील चर्चांना उधाण सुटलं आहे. काल, राष्ट्रवादी काँग्रेसची महत्वाच्या नेत्यांसह सर्व खासदारांसह अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईत बैठक पार पडली. तर, राज्यातील काँग्रेस नेते येत्या सोमवारी वा मंगळवारी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या भेटीला जाणार असल्याचे आज समोर आले आहे.

यातच, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची मुंबईतील राजभवनात भेट घेतली आहे. राज्यपालांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून याबाबत माहिती देण्यात आली असून हि सदिच्छा भेट असल्याचं म्हटलं आहे. तर, काँग्रेससमधील आमदार ते मंत्री अशा अनेकांची नाराजी असल्याचे कळून येत होते. त्यामुळे कालपासून घडणाऱ्या राजकीय बैठका व घडामोडी राजकीय भूकंपाची चाहुल तर देत नाहीये ना? असा प्रश्न निर्माण होत आहे.

मुंबई कि तुंबई? मुंबईत नालेसफाई नाही तर हातसफाई होते: देवेंद्र फडणवीस

दरम्यान, काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे नेते व सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी देखील नाराजी व्यक्त केली होती, मात्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मध्यस्थी करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत घेतलेल्या बैठकीत हि नाराजी दूर झाल्याचे समोर आले होते. सुरुवातीपासून मिळणाऱ्या वागणुकीवरून काँग्रेसने वेळोवेळी नाराजी व्यक्त केली आहे.

चीनशी सामनाचं काय, तर नाव घेण्याचे देखील मोदींमध्ये धाडस नाही; राहुल गांधींचे मोदींच्या हिम्मतीलाच आव्हान

तर, आता याच नाराजी नाट्यामुळे राज्यातील महाविकास आघाडीबाबत चर्चा करण्यासाठी महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्यांनी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांची वेळ मागितल्याचे वृत्त समोर येत आहे. सोमवारी वा मंगळवारी सोनिया गांधी यांची वेळ मिळू शकते असे आता समजत आहे. महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादीला झुकते माप दिले जाते असा आरोप करत राज्यातील काँग्रेस नेत्यांसह आमदारांनी देखील नाराजीचा सूर उभारला होता. त्यामुळे दिल्लीतील भेटीत काय चर्चा वा दिशा ठरणार यावर महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे.

पत्नी खासदार नवनीत कौर राणा यांच्यानंतर आता आमदार रवी राणा यांना देखील कोरोना संसर्ग