मराठा समाजासाठी हा दुर्दैवी दिवस : खासदार संभाजीराजे

maratha

नवी दिल्ली- राज्यासह संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या मराठा आरक्षणावर सुप्रीम कोर्टाने महत्वाचा निर्णय दिला आहे. सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केलं आहे. राज्य सरकारने बनवलेला मराठा आरक्षण कायदा सुप्रीम कोर्टाने रद्द केला आहे. यामुळे महाराष्ट्र सरकारला खूप मोठा धक्का बसला आहे.

इंद्रा सोहनी प्रकरणात सुप्रीम कोर्टाने जी 50 टक्के आरक्षण मर्यादा आखली होती ती ओलंडण्यास नकार दिला आहे.मराठा आरक्षण देत असताना 50 टक्क्यांची मर्यादा भंग करण्यासाठी कोणताही वैध आधार नव्हता, असं निरीक्षण सुप्रीम कोर्टाने आपल्या निकालात नोंदवलं आहे.

गायकवाड समितीच्या शिफारसी स्वीकारण्याजोग्या नाहीत, असं सर्वोच्च न्यायालयाकडून सांगण्यात आले आहे. न्यायमूर्ती अशोक भूषण यांनी मराठा सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय आहेत अशी दुरुस्ती संपुष्टात आल्याचं सांगितलं. 50% ची मर्यादा ओलांडून दिलेले आरक्षण अवैध असल्याचं कोर्टाने सांगितलं.

दरम्यान, पाचसदस्यीय खंडपीठासमोर मराठा आरक्षण प्रकरणी याचिकेवर सुनावणी झाली. न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या अध्यक्षतेखाली न्या. नागेश्वर राव, एस. अब्दुल नझीर, हेमंत गुप्ता आणि रविंद्र भट यांनी निकालाचं वाचन केलं आहे.

दरम्यान, या निकालानंतर आता विविध स्तरातून प्रतिक्रिया येत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगितीचा निर्णय दिला. निकाल हा निकाल आहे, पण मराठा समाजासाठी हा दिवस दुर्दैवी दिवस आहे, असं मत खा. छत्रपती संभाजीराजे यांनी व्यक्त केलं. माझा लढा गरीब मराठा घटकांसाठी होता. पण निकाल मान्य करावा लागतो, असं ते म्हणाले. दोन्ही सरकारनी आपली भूमिका जोमाने मांडली. महामारी सुरू असताना उद्रेक होऊ नये अशी इच्छा असल्याचं संभाजीराजे म्हणाले.

मराठा आरक्षणाबाबत सगळ्यात संतुलित प्रतिक्रिया छत्रपती संभाजी राजे यांनी दिली आहे. सगळ्यांनी प्रामाणिक प्रयत्न केले व सगळ्या वकिलांनी चांगली बाजू मांडली असे ते म्हणाले.Supernumerary म्हणजे जादा जागा देण्याची पद्धती वापरणे हाच आता राज्यसरकार समोर मार्ग असल्याचे ते म्हणाले. उद्रेक हा शब्द सुद्धा कुणी काढू नये. सामाजिक स्वास्थ्य व आरोग्याचे प्रश्न गंभीर आहेत त्यामुळे समाजाने शांत राहावे ही अत्यंत महत्वाची सूचना त्यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या