मोठी बातमी! ममता बॅनर्जी ५ मे रोजी घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ

mamta

कोलकाता : पश्चिम बंगालच्या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस पुन्हा सत्तेत आलेय. ममतांना पराभूत करण्यासाठी या निवडणुकीत भाजपने आपली संपूर्ण प्रचारयंत्रणा आणि दिग्गज नेत्यांना मैदानात उतरवले होते. हे आव्हान स्विकारत ममता बॅनर्जी भाजपसमोर ठामपणे उभ्या राहिल्या होत्या. भाजपचा ममता बॅनर्जींनी पार धुव्वा उडवला.

पश्चिम बंगालच्या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसनं २९२ पैकी २१३ जागांवर विजय मिळवला आहे. भाजपाचे ७७ जागांवर उमेदवार जिंकले आहेत. तर राष्ट्रीय सेक्युलर मजलिस पार्टीचा १ उमेदवार, तसेच एका अपक्ष उमेदवारानं विजय मिळवला आहे. मात्र काँग्रेस आणि डावे पक्ष निवडणुकीत आपलं खातंही खोलू शकले नाहीत. गेल्या निवडणुकीत काँग्रेसचे ४४ तर माकपचे २५ आमदार निवडूण आले होते.

त्यानंतर आता ५ मे रोजी म्हणजेच बुधवारी ममता बॅनर्जी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. त्यानंतर ६ मे राजी सर्व आमदारांचा शपथविधी होणार आहे. याप्रसंगी विजयी रॅली काढू नका, असं ममता बॅनर्जींनी आवाहन केले आहे.

दरम्यान, पश्चिम बंगालच्या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली तृणमूल काँग्रेसनं घवघवीत यश मिळवलं आहे. तृणमूल काँग्रेसने तिसऱ्यांदा सत्ता मिळवली असून ममता बॅनर्जी मुख्यमंत्रिपदी विराजमान होणार आहेत. भाजपानं ७७ जागांवर विजय मिळवला असून विरोधकाची भूमिका बजावणार आहे. मात्र स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच डावे पक्ष आणि काँग्रेसचा एकही आमदार विधानसभेत नसणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या