मोठी बातमी : संपूर्ण महाराष्ट्रात 31 जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढला

lockdown

मुंबई : महाराष्ट्र सरकार एकीकडे करोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रयत्न करत असताना दुसरीकडे अनलॉकच्या दिशेने वाटचाल सुरु केली आहे. राज्यातील लॉकडाऊन 30 जुनपर्यंत असून पुढे काय, असा प्रश्न राज्यातील नागरिकांना पडला होता. राज्यात टप्प्या-टप्प्याने अनलॉक होत आहे, मात्र अद्यापही जिल्हाबंदी कायम आहे. त्यातच, एसटी महामंडळाकडून बससेवा सुरु करण्यात आली नाही. त्यामुळे, जुलै महिन्यातील अनलॉकमध्ये आणखी काय शिथिलता मिळणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

३० जून रोजी लॉकडाउन संपत असून मिशन बिगिन अगेनचा पहिला टप्पा सध्या सुरु आहे. राज्यातील लॉकडाऊन 31 जुलैपर्यंत वाढविण्यात आल्याचे परिपत्रक राज्य सरकारने जारी केले आहे. ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत देण्यात आलेल्या सवलती, नियमांमधील शिथीलता कायम राहील, असंही या आदेशात स्पष्ट करण्यात आलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी रविवारी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनेतला आवाहन केलंय की, अद्याप काळजी घेणे गरजेचं आहे. कोरोनाचं संकट अद्यापही टळलेलं नाही. सध्या आपण कात्रीत सापडलो असून अर्थचक्राला गती देण्यासाठी आपण मिशन बिगेन अगेन सुरु करतोय. मात्र, लॉकडाउन सुरुच राहणार आहे. त्यानंतर, सरकारने 31 जुलैपर्यंत राज्यातील लॉकडाऊन वाढवला आहे.

राज्य सरकारने एक महत्त्वाची माहिती यावेळी दिली आहे. करोनाचा फैलाव रोखण्यासाठी संबंधित जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त योग्य ती पाऊलं उचलत स्थानिक परिसरात निर्बंध लागू करु शकतात असं राज्य सरकारने सांगितलं आहे. कोरोना संसर्ग रोखण्याच्या दृष्टीने अनावश्यक गोष्टींना परवानगी नाकारण्याची तसंच लोकांच्या हालचालींवर ते प्रतिबंध आणण्याची परवानही त्यांना देण्यात आली आहे.

धक्कादायक ! महाराष्ट्रात गेल्या २४ तासात ५ हजार २४ करोना रुग्णांची भर

महाराष्ट्रातील मंदिरे सुरु करा,अन्यथा…

मोदी सरकार देणार चीनला जोरदार झटका, ‘हा’ मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत