Share

Jitendra Awhad Arrest | मोठी बातमी : जितेंद्र आव्हाड पोलिसांच्या ताब्यात ; नेमकं प्रकरण काय ?

Jitendra Awhad Arrest | मुंबई : जितेंद्र आव्हाड यांना ठाण्यातील मॉलमधील मारहाण प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. विधियाना मॉलमधील हर हर महादेव चित्रपटाचा शो आव्हाड यांनी बंद पडला होता. आव्हाड यांचे कार्यकर्ते मॉलमध्ये घुसले. यावेळी एका प्रेक्षकाला मारहाण केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी शंभर जणांवर गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी कठोर कारवाईचे आदेश गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते.

 जितेंद्र आव्हाड यांचे स्पष्टीकरण – 

आज दुपारी साधारण 1 वाजता मला वर्तकनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. निकम यांचा फोन आला आणि नोटीस घेण्यासाठी मी माणूस पाठवतो नाहीतर तुम्ही पोलीस स्टेशनला या असे ते म्हणाले. मी मुंबईला जायला निघालो होतो. परंतु मी चांगुलपणाने म्हटलं कि, मी पोलीस स्टेशनला येतो आणि नंतर मी मुंबईला जातो. मी पोलीस स्टेशनला गेलो असताना त्यांनी मला गप्पांमध्ये गुंतवून ठेवलं. त्यानंतर डीसीपी राठोड हे पोलीस स्टेशनला आले. त्यांच्या डोळ्यांत आणि चेह-यावरती अस्वस्थपणा दिसत होता. हतबलता दिसत होती. ते आदराने म्हणाले कि, मी काही करु शकत नाही. वरुन आदेश आले आहेत. तुम्हांला अटक करावी लागेल. हा पोलीसी बळाचा गैरवापर आहे. आता मी लढायला तयार आहे. फाशी दिली तरी चालेल. पण, मी जे केलेलं नाही तो मी गुन्हा कबूल करणार नाही.

विद्या चव्हाण आक्रमक –

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी देवेंद्र फडणवीस यांना सवाल केला आहे. त्या म्हणाल्या, “भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहखाते आहे. त्याचा गैरवापर सुरु झाला आहे. ज्यांना अटक करायला पाहीजे त्यांना अटक केली जात नाही. मनसेच्या नेत्यांनी कितीवेळा मारहाण केली, पण त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. आमचं सरकार असताना कधीही गृहखात्याचा गैरवार झाला नाही. जितेंद्र आव्हाड यांना केलेल्या अटकेचा मी निषेध करते. रविंद्र चव्हाण यांना कधी अटक करणार? हा माझा प्रश्न आहे. संदीप माळी नावाचा भाजपचा कल्याणचा गुंड, जो भाजपच्या उपाध्यक्ष आहे. त्याने १४ वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला होता. देवेंद्र फडणवीस ५ वर्ष मुख्यमंत्री होते. फडणवीसांनी त्याला वाचवले आहे. आजही वाचवत आहेत. त्याच्या गुंडगिरीला लोक कंटाळले आहेत. मनसेचे आमदार आणि रविंद्र चव्हाण त्याला प्रोटेक्ट करत आहेत. देवेंद्र फडणवीसांमध्ये हिंमत असेल तर रविंद्र चव्हाण आणि संदीप माळीला अटक करुन दाखवावी. तर मी त्यांना खरं गृहमंत्री म्हणेल.”

महत्वाच्या बातम्या :

Jitendra Awhad Arrest | मुंबई : जितेंद्र आव्हाड यांना ठाण्यातील मॉलमधील मारहाण प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. विधियाना मॉलमधील हर …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now

संबंधित बातम्या