मोठी बातमी! कोरोनाच्या विळख्यामुळे आयपीएल स्पर्धा अनिश्चीत काळासाठी स्थगित

मुंबई : राज्य आणि देशात गेल्या काही आठवड्यापासून कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. या काळात भारतात आयपीएल स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेचा पहिला टप्पा यशस्वीपणे पार पडला. मात्र स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात कोरोनाने आयपीएलला गाठले. स्पर्धेत कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आयपीएल स्पर्धा ही अनिश्चीत काळासाठी रद्द करण्यात आली आहे. बीसीसीआयने एक पत्रक जाहीर करुन ही माहिती दिली आहे.

सोमवारी ३ मे रोजी केकेआरच्या संघाचे २ खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर चेन्नईच्या संघातील तीन सदस्यही कोरोनाच्या जाळ्यात ओढले गेले. यादरम्यान कोरोनामुळे आयपीएलचे दोन सामने रद्द करण्यात आले होते. मात्र मंगळवारी ४ मे रोजी आयपीएल स्पर्धा ही एका आठवड्यासाठी रद्द करण्यात आली आहे. कारण मंगळवारी हैदराबाद संघातील वृद्धीमान साहा आणि दिल्ली कॅपीटल्सचा अमित मिश्रा याना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.

या परिस्थीतीत ४ मे रोजी होणारा मुंबई-हैदराबाद संघादरम्यानचा सामना रद्द झाला होता. मात्र या सामन्यासोबत संपुर्ण आयपीएल स्पर्धा ही अनिश्चीत काळासाठी रद्द करण्यात आली आहे. देशात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे दिल्ली हायकोर्टात स्पर्धा रद्द करण्यात यावी अशी याचिकाही दाखल करण्यात आली होती. सद्यस्थितीत आयपीएलमध्ये केकेआर, दिल्ली कॅपीटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद संघाच्या खेळाडूंना तर सीएसकेच्या सदस्याना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून आयपीएल स्पर्धा रद्द करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या