मोठी बातमी: इंदुरीकर महाराजांची आज कोर्टात महत्वाची सुनावणी

संगमनेर: प्रसिद्ध लोकप्रिय कीर्तनकार निवृत्ती इंदुरीकर महाराजांवर काही आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे आता इंदुरीकर महाराजांच्या अडचणीत आणखी वाढ होणार का? याकडे वारकरी सांप्रदायासह त्यांच्या चाहत्यावर्गाचे लक्ष लागले आहे. तर, गुन्हा दाखल झाल्यानंतर आता आज (दि. ७ ऑगस्ट) इंदोरीकर महाराजांना कोर्टात हजर राहण्याचा आदेश देण्यात आला आहे. त्यामुळे, इंदोरीकर महाराज आज कोर्टात हजर राहून आपली काय भूमिका मांडणार हे देखील महत्वाचं ठरणार आहे.

‘अमुक दिवशी स्त्रिसंग केला तर मुलगा होतो किंवा मुलगी होते’ असं वक्तव्य असलेला इंदुरीकर महाराज यांचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर टिकेची झोड उठली होती. काही सामाजिक संघटना आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीने इंदोरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करा अशी मागणी केली होती. मात्र, या व्हिडिओतील वक्तव्य कुठे आणि कधी केले याबाबत पुरावा नसल्याचे कारण देत मार्च मध्ये अहमदनगर जिल्हा प्रशासनाने गुन्हा दाखल केला नव्हता.

बाबर तुमचा कोण लागतो? शिवसेनेने ओवैसींवर डागली तोफ

तर, अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या रंजना गवांदे यांनी याबाबत मात्र  पाठपुरावा करून संबंधित प्रकरणाचे पुरावे जिल्हा आरोग्य विभागाला दिल्यानंतर 26 जुन रोजी संगमनेर कोर्टात जिल्हा आरोग्य प्रशासनाने इंदोरीकर महाराज यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.  इंदुरीकर महाराज यांच्या विरोधात संगमनेर शहर वैद्यकीय अधिकारी भास्कर भवर यांच्या फिर्यादीवरून संगमनेर कोर्टात PCPNDT अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

कोल्हापुरात पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज – सतेज पाटील

त्यामुळे इंदुरीकर समर्थक आता आक्रमक झाले आहे. इंदुरीकर समर्थकांनी काही दिवसांपूर्वी संगमनेर तहसील कार्यालयात निवेदन दिले होते. इंदुरीकर यांच्यावरील खोटा गुन्हा मागे घेण्याची मागणी केली आहे. जर इंदुरीकर महाराजांवरील गुन्हा मागे घेण्यात आला नाहीतर रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशाराही समर्थकांनी दिला आहे. भाजपा, मनसे या पक्षांतील नेत्यांसह अनेक सामाजिक क्षेत्रातील पुढाऱ्यांनी देखील इंदुरीकर महाराजांचे समर्थन करत, त्यांनी आजपर्यंत केलेल्या समाजप्रबोधनाची जाण ठेवत गुन्हा रद्द करण्याची मागणी केली होती.

‘ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही समान आणि दर्जेदार शिक्षण मिळण्याची सोय झाली’