मोठी बातमी: IPL २०२० यूएईमध्ये खेळवण्यास सरकारकडून मान्यता; लवकरच अधिकृत परवानगी मिळणार

दिल्ली: कोरोनामुळे सर्व क्षेत्रांवर विपरीत परिणाम झाला असून अनेकांचे आर्थिक नुकसान झाले आहे, तर कित्येकांना बेरोजगारीशी देखील सामना करावा लागत आहे. यातच, कोट्यवधी चाहते असणाऱ्या आयपीएल (IPL) या टी-२० क्रिकेट प्रकाराच्या मालिकेस देखील तात्काळ पुढे ढकलावे लागले होते. बीसीसीआयतर्फे सप्टेंबरमध्ये हि स्पर्धा खेळण्यास विचार केला जात होता.

दरम्यान ,अडसर ठरू शकणाऱ्या टी-२० विश्वचषक यंदाच्या वर्षी रद्द करून पुढे ढकलण्यात आल्यानंतर IPL च्या आयोजनाचा मार्ग मोकळा झाला होता. कोरोनाचा धोका बघता आयपीएल चे सर्व सामने यूएईमध्ये खेळवणार जाणार असल्याची घोषणा बीसीसीआयने याआधीच केली होती. त्यानुसार, १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत या स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे.

“सडक २” या हिंदी चित्रपटाची रिलीज डेट जाहीर! ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर होणार रिलीज

आता, याबाबत आणखी एक महत्वाची माहिती बीसीसीआयच्या सूत्रांनी एएनआई या वृत्त संस्थेला दिली आहे.”आयपीएल यूएईत खेळवण्यासाठी सरकारकडून मान्यता मिळाली असून, अजून अधिकृत कागदपत्रे आलेले नाहीत, येत्या काही दिवसांत हि अधिकृत परवानगी मिळेल, असे आम्हाला अपेक्षित आहे.”अशी माहिती सद्या बीसीसीआयच्या सूत्रांकडून मिळत आहे.

‘या’ निर्णयाबद्दल राज्य सरकारला उच्च न्यायालयाचा दणका!

तर, एकूण ८ फ्रँचायजी संघ या स्पर्धेत भाग घेणार असून, या संघांतील सर्व खेळाडूंना क्वारंटाईन करण्याच्या हालचाली सुरु असल्याचं देखील समजत आहे. तर, खेळाडूंच्या कोरोना चाचणीची देखील तयारी करण्यात येत आहे. या स्पर्धेचे सामने दुबई, शाहजाह आणि अबुदाभी येथील स्टेडियममध्ये पार पडतील.

विजयदुर्ग किल्ल्याची पडझड; खासदार संभाजीराजेंनी पुन्हा गाठली दिल्ली