fbpx

बेरोजगारांसाठी खुशखबर, महावितरणमध्ये ७००० जागांसाठी भरती

टीम महाराष्ट्र देशा : बेरोजगारांसाठी आता खुशखबर आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी म्हणजेच महावितरणमध्ये तब्बल ७००० जागांसाठी भरती प्रक्रिया होत आहे. त्यामुळे बेरोजगार तरुणांसाठी आता रोजगार उपलब्ध झाला आहे.

महावितरणने एक जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यामध्ये ७००० जागांसाठी भरती प्रक्रिया होत आहे. विद्युत सहाय्यकाची ५००० आणि उपकेंद्र सहाय्यकाची २००० पदं भरली जात आहेत, ज्यासाठी २६ जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहे. यासाठी उमेदवाराची पात्रता किमान १२ वी पास असणं आवश्यक आहे, तसंच त्याच्याकडे राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे.

दरम्यान, यासाठी उमेदवाराचं वय १८ ते २७ या दरम्यान असणं गरजेचं आहे. तसेच विविध आरक्षणानुसार वयामध्ये सूट लागू राहणार आहे. तसेच ही भारती कंत्राटी पद्धतीच्या स्वरुपात होणार आहे. या भरतीमध्ये पात्र उमेदवाराला तीन वर्षांच्या कंत्राटावर सेवा करण्याची संधी मिळणार आहे.