टीम इंडियासाठी मोठी बातमी; रिषभ पंतचा विलगीकरणाचा कालावधी संपुष्टात

मुंबई : इंग्लंड दौऱ्यातील डब्ल्युटीसी स्पर्धेच्या अंतिम सामन्यानंतर भारतीय संघ काही काळासाठी सुटीवर गेला होता. याकाळात इंग्लंडमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढतच होता. याचा परिणाम म्हणून भारतीय संघाचा यष्टीरक्षक रिषभ पंतला कोरोनाची लागण झाली.

रिषभ पंतला कोरोनाची लागण झाल्यानंतर भारतीय संघाला मोठा धक्का बसला. मात्र यादरम्यान भारतीय संघासाठी एक चांगली बातमी समोर आली आहे. कोरोनाची लागण झालेला यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतचा विलगीकरणाचा कालावधी संपुष्टात आला आहे. यामुळे तो लवकरच भारतीय संघासोबत सामील होऊ शकतो. मात्र डरहम येथील सराव सामन्यात त्याला सहभागी होता येणार नाही.

रिषभ पंतचा विलगीकरणाचा कालावधी १८ जुलै रोजी संपुष्टात आला असुन येत्या २२ किंवा २३ जुलै रोजी तो भारतीय संघाच्या बायोबबलमध्ये प्रवेश करु शकतो. यामुळे २८ जुलै पासुन सुरु होणाऱ्या भारतीय संघाच्या दुसऱ्या सराव सामन्यात त्याला सहभागी होता येईल. यापुर्वी २० जुलै रोजी होणाऱ्या सराव सामन्यात यष्टीरक्षकाची जबाबदारी लोकेश राहुल पार पाडणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP