मोठी बातमी : ताज हॉटेजवळच्या इमारतीला भीषण आग

blank

टीम महाराष्ट्र देशा : ताज हॉटेजवळच्या चर्चिल चेंबर या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर भीषण आग लागली आहे. आगीची माहिती समजताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

सुदैवाने या आगीत कोणतीही जिवीतहानी झाली नाही. परंतु, ही आग कशामुळे लागली याचे अद्याप समजले नाही. या इमारतीत काही लोक अडकल्याची शक्यता वर्तविली जात आहे.