मोठी बातमी! दिल्लीतील महाराष्ट्र सदनात आग; राज्यपालांच्या खोलीचे मोठे नुकसान

नवी दिल्ली: दिल्ली येथे असलेल्या महाराष्ट्र सदनात आज सोमवारी सकाळी आग लागली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या ४ गाड्या घटनास्थळी पोहोचल्यात. अग्निशामक दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आल्याची माहिती मिळाली आहे. त्याचबरोबर दिल्ली पोलिसांचे एक पथकही घटनास्थळी पोहोचले आहे.

नवीन महाराष्ट्र सदनमधील राज्यपालांच्या खोलीला आग लागली आहे. आग लागल्याने महाराष्ट्र सदनात धूरच धूर पसरला आहे. आसपासच्या खोलीत राहणा-यांना बाहेर काढण्यात आलं आहे. राज्यपालांच्या खोलीच्या आसपासच्या खोल्या रिकाम्या करण्यात आल्या आहेत. आगीत फर्निचरचे मोठे नुकसान झाले आहे. राज्यपालांच्या खोलीतील सर्व सामान बाहेर काढण्यात आलं आहे. आग कशामुळे लागली याचे नेमके कारण समजू शकले नाही. पण शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

आगीची माहिती मिळाल्यानंतर अग्निशामक दलाच्या चार गाड्या घटनास्थळी तातडीने रवाना झाल्या असून, आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले असल्याचे सांगितले जात आहेत. तसेच या घटनेची माहिती मिळताच दिल्ली पोलिसांनीही घटनास्थळाकडे धाव घेतल्याचे समजते.

महत्त्वाच्या बातम्या