मोठी बातमी : शेतकऱ्यांचा संसद भवनावरील मोर्चा स्थगित; शेतकरी संघटनांचा महत्वाचा निर्णय

farmers

दिल्ली : २६ जानेवारी रोजी कृषी कायद्यांच्या निषेधार्थ संयुक्त शेतकरी संघटनांनी दिल्लीतील हद्दीत प्रवेश करून ट्रॅक्टर मोर्चा काढला होता. यावेळी, पोलिसांनी दिलेला मार्ग सोडून आंदोलक शेतकऱ्यांनी आपला मोर्चा दिल्लीतील इतर भागात वळवला. पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता धुमश्चक्री उडाली.

हे आंदोलन शेतकरी नेत्यांच्या हाताबाहेर गेले होते. या आंदोलनामुळे प्रजासत्ताक दिनाला गालबोट लागल्याने राजकीय नेत्यांसह शेतकरी नेत्यांनी देखील आंदोलकांच्या आक्रमक कृत्याचं निषेध केलं आहे. गेल्या दोन महिन्यांहून अधिक काळ शेतकरी दिल्लीच्या सीमांवर कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करत आहेत. ट्रॅक्टर मोर्चानंतर याचा पुढील भाग म्हणून शेतकरी संसद भावनांवर पायी मोर्चा काढणार होते.

मात्र, २६ जानेवारी रोजी झालेल्या ट्रॅक्टर रॅलीचे पडसाद लक्षात घेता संयुक्त शेतकरी संघटनेने १ फेब्रुवारीचा पायी मोर्चा रद्द केल्याचे सांगितले आहे. या ऐवजी महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी दिवशी म्हणजेच ३० जानेवारी रोजी सर्व शेतकरी उपोषण करून आपला निषेध व्यक्त करणार आहेत, अशी माहिती पत्रकार परिषदेतून देण्यात आली आहे. दरम्यान, व्ही एम सिंह गटापाठोपाठ भारतीय किसान युनियनने देखील या आंदोलनातून माघार घेतली आहे.

महत्वाच्या बातम्या