fbpx

मोठी बातमी : विदर्भ आणि मराठवाड्यात भूकंपाचे धक्के

टीम महाराष्ट्र देशा : शुक्रवारी रात्री उशिरा विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. या धक्क्यांमुळे काही घरांना तडे गेले आहेत त्यामुळे नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावर होते.

मिळालेल्या माहितीनुसार नांदेड, अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. हे धक्के ८ ते १० सेकंदासाठी धक्के जाणवले. नांदेडमध्ये या भूकंपाची तीव्रता ३.९ रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली आहे. या धक्क्यांमुळे कोणत्याही प्रकारचं नुकसान झालेलं नाही अशी माहिती आहे.

दरम्यान, नांदेड जिल्ह्यातील किनवट आणि माहूर तालुक्यातील विविध गावांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. तर यवतमाळ जिल्ह्यातील महागाव, फुलसावंगी, उमरखेड भागात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. त्यानंतर प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी कामाला लागले आहेत.