मोठी बातमी! नाराज जितेंद्र आव्हाड देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला

मुंबई : गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हस्ते कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी लालबागच्या ‘सुखकर्ता’ इमारतीमध्ये वितरित केलेल्या गाळ्यांच्या स्थगितीचे प्रकरण ताजे आहे. याच दरम्यान जितेंद्र आव्हाड यांनी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची चर्चा सध्या सुरू आहे. या भेटीदरम्यान जवळपास दोन तास आव्हाड ‘नॉट रिचेबल’ होते. त्यांच्या भेटीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पूर्णतः अनभिज्ञ होते.

कर्करोग रुग्णांच्या नातेवाईंका देण्यात आलेल्या घरांचे स्थान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बदलल्यानंतर गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड कमीलीचे नाराज झाले आहेत. यानंतरच आव्हाड यांनी देंवेंद्र फडणवीस यांची गुप्त भेट घेतली आहे. दोघांच्या भेटीचं नेमकं कारण काय होतं? हे गुलदसत्यातच आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या भेटीगाठींना फार महत्वं आलं असतानाच आव्हाड फडणवीस यांची भेटही गाजण्याची शक्यता आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीची उद्धव ठाकरे यांना पुसटशीही कल्पना नसल्यामळे राजकीय चर्चेला उधाण आलं आहे.

देवेंद्र फडणवीस आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात जवळपास अडीच तास चर्चा झाली आहे. निर्णय फिरवला जाणार, याची कल्पना ज्या दिवशी मिळाली, त्याच दिवशी आव्हाडांनी फडणवीस यांची भेट घेतली, असं सांगितलं जातेय

प्रवीण दरेकर होते सोबतीला
आव्हाड यांनी आपली सरकारी गाडी, पोलिसांचा बंदोबस्त, शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचा ताफा सोडून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. ही भेट घेण्यासाठी आव्हाड विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासोबत फडणवीस यांच्या बंगल्यावर पोहोचले होते, अशी विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे.

महत्वाच्या बातम्या

IMP