मोठी बातमी : EWS प्रवेशाबाबत मराठा समाजाला न्यायालयाचा दिलासा

maratha reservation

मुंबई : महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या स्थगितीनंतर वातावरण चांगलंच तापलेलं पाहायला मिळालं. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणास स्थगिती दिल्यानंतर राज्यभरात मराठा समाजाने आक्रमक होऊन आंदोलने केली. यानंतर, स्थगिती उठवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारने याचिका दाखल केल्या.

मराठा आरक्षण उठवण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. अशातच उच्च न्यायालयाने मराठा समाजाला एक मोठा दिलासा दिला आहे. मराठा समाजातील विद्यार्थ्यांना आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्ग (EWS) प्रवेश घेण्यासाठी उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. मात्र, ईडब्ल्यूएसमधून प्रवेश घेतल्यानंतर संबंधित विद्यार्थ्याला सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्गातील (SEBC) असल्याचा दावा करून कोणतेही शैक्षणिक लाभ घेता येणार नाही, असंही न्यायालयाने स्पष्ट केले.

मराठा समाजातील तरुणांना शासकीय नोकऱ्या आणि शिक्षणामध्ये आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. परंतु, राज्य सरकारच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. सर्वोच्च न्यायालयामध्ये मराठा आरक्षण याचिकेवर सुनावणी सुरू आहे. या दरम्यान, न्यायाधीश संभाजी शिंदे व न्यायाधीश माधव जामदार यांच्या खंडपीठाने आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्ग (EWS) बद्दल महत्त्वपूर्ण निर्णय दिला, असं वृत्त दैनिक लोकमतने दिले आहे.

महत्वाच्या बातम्या