मोठी बातमी! आयपीएलला कोरोनाचा दुसरा धक्का, चेन्नई-राजस्थान सामनाही पुढे ढकलला

मुंबई : राज्य आणि देशात गेल्या काही आठवड्यापासून कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. या काळात भारतात आयपीएल स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेचा पहिला टप्पा यशस्वीपणे पार पडला. मात्र स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात कोरोनाने आयपीएलला गाठले. सोमवारी ३ मे रोजी आयपीएलमध्ये काही खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे.

सोमवारी चेन्नईच्या संघातील ३ सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांनी त्यांचा स्पर्धेतील पुढील सामना पुढे ढकलण्याची विनंती बीसीसीआयला केली आहे. यावेळी चेंन्नईचे अधिकारी म्हणाले की,’ आमच्या संघातील काही सदस्याना कोरोनाची लागण झाल्याने इतरांचीही कोरोना चाचणी झाल्यानंतर त्यांचे अहवाल निगेटिव्ह येणे किती अवश्यक आहे याची बीसीसीआयला कल्पना आहे. यामुळे आमचा राजस्थानविरुद्धचा येता सामना इतर कोणत्या दिवशी घेण्याची विनंती आम्ही बीसीसीआयला केली आहे’. यावेळी अधिकारी असेही म्हणाले की, ‘बीसीसीआयच्या कोरोना नियमांनुसार कोरोना संक्रमित व्यक्तीला ६ दिवसांचा विलगीकरण कालावधी पूर्ण करावा लागतो. यामुळे आमचा पुढील सामना खेळू शकत नाही.’

चेन्नई संघाच्या विनंतीला मान देत बीसीसीआयने हा सामना पुढे ढकलण्याचे ठरवले आहे. एकाच आठवड्यातील दुसरा सामना कोरोनामुळे रद्द होण्याची ही दुसरी वेळ आहे. याआधी सोमवारी ३ मे रोजी होणारा केकेआर आणि आरसीबी संघातील सामना पुढे ढकलण्यात आला. चेन्नईचे सीईओ कासी विश्वनाथन, गोलंदाजी प्रशिक्षक लक्ष्मीपती बालाजी आणि बस चालक यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आढळला होता.

महत्वाच्या बातम्या