मोठी बातमी : आयपीएलमध्ये कोरोनाचा शिरकाव, आज होणारा कोलकाता विरुद्ध बँगलोर सामना रद्ध

ipl

अहमदाबाद : देशाच्या कानाकोपर्यात कोरोना विषाणूने थैमान घातलेले आहे. याच कोरोना विषाणूने आता आयपीएलमध्ये शिरकाव केला आहे. आयपीएलच्या मैदनातून मोठी घडामोड समोर आली आहे. कोलकाता नाइट रायडर्स संघातील फिरकीपटू वरुण चक्रवर्थी, संदीप वॉरियर यांना कोरोनाची लागण झाली आहे. यासोबत आणखी काही खेळाडूंची तब्येत बिघडल्याचंही सांगण्यात येत आहे. त्यामुळे केकेआरचा संपूर्ण संघ विलगीकरणात गेला असून आयपीएलच्या आजच्या सामन्याची वेळ बदलण्याची आल्याची माहिती समोर आली आहे.

आयपीएलमध्ये आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगोलर यांच्यात लढत होणार होती. कोलकोताचा संपूर्ण संघ आणि सपोर्ट स्टाफ देखील आता विलगीकरणात गेला असल्यानं आजचा सामान होऊ शकणार नाही, अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान, बीसीसीआयकडून याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

कोलकत्ता संघातील वरुण चक्रवर्थी आणि संदीप वॉरियर यांना कोरोनाची लागण झाली आहे. तर वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स देखील कोरोनाच्या विळख्यात सापडल्याची माहिती सध्या मिळत आहे. कोलकत्ता संघातील खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानं रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघानं देखील आजचा सामना खेळण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आजचा सामना पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं बोललं जात आहे. परंतु आता यामुळे इतर सर्व खेळाडूंची कोरोन चाचणी करण्यात येणार आहे. त्यामुळे यापुढील आयपीएलच्या सामन्यांवर कोरोनच सवत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.

महत्त्वाच्या बातम्या