मोठी बातमी! ‘महाराष्ट्रात काँग्रेस निवडणुका स्वबळावर लढणार!’, राहुल गांधींना भेटल्यानंतर पटोलेंची घोषणा

nana patole

मुंबई : महाराष्ट्रातील आगामी सर्व महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच लढण्याची घोषणा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज केली आहे. नाना पटोले यांनी आज दिल्लीत जाऊन राहुल गांधी यांची भेट घेतली. स्वबळावर निवडणूक लढण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सहमती दिल्याची माहिती पटोले यांनी दिलीय.

विधानसभा निवडणुकीला अजून वेळ आहे. पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढेल. सरकार आणि संघटना या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. त्याला सर्व पक्षांनी मान्यता दिली आहे. त्यामुळे हा वाद संपलेला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार आहे, यात काही वादच नाही, असं नाना पटोले म्हणाले. राज्यात काँग्रेसला वाढीसाठी मोठी स्पेस आहे. त्यामुळे सखोल चर्चेअंती निवडणुका स्वबळावर लढण्याचं निश्चित कऱण्यात आल्याचं नाना पटोले म्हणाले.

शिवसेनेला डिवचले

काँग्रेस पक्षात डरपोक लोकांना स्थान नाही असे राहुल म्हणतात ते बरोबर आहे. पण पक्षामधून ‘डरपोक’ जात राहिले तरी काँग्रेस पक्ष हिंमतबाज कार्यकर्ते निर्माण करण्याची फॅक्टरी आहे काय? असा सवाल शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना दैनिकात करण्यात आला आहे. यावर माध्यमांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना प्रश्न विचारला. यावेळी त्यांनी ‘सामना’वर मी कोणतीही प्रतिक्रिया देत नाही कारण मी ‘सामना’ वाचत नाही असे उत्तर दिले. तसेच कुणी काय टीका करावी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण वारंवार त्याच त्याच गोष्टी सोबत राहून बोललं जातं असेल तर त्याचा विचार आम्हाला एकदा करावा लागेल असेही ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

IMP