मोठी बातमी! चंद्रकांत पाटील उद्या राज ठाकरेंची भेट घेणार, राजकीय वर्तुळात खळबळ

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देणारी घटना आता उद्या शुक्रवारी घडली आहे. भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीबाबत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहेत. दोन्ही पक्षांच्या वतीने याबाबत उलटसुलट प्रतिक्रिया येत होत्या. मात्र, आता या युतीवर शिक्कामोर्तब होण्याचे पहिले पाऊल पडणार असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आपण भेट घेणार असल्याची माहिती खुद्द चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. उद्या ते राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत. राजकारणामध्ये एकच गोष्ट कायम राहत नाही. उद्याची भेट ही केवळ राजकीय विचारांची देवाणघेवाण आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हणालेत. यापूर्वी राज ठाकरे आणि चंद्रकांत पाटील नाशिक दौऱ्यावर होते. त्यावेळी या दोन्ही नेत्यांची भेट झाली. राज ठाकरे आणि पाटील यांच्यात त्यावेळी पंधरा मिनिटे चर्चाही झाली होती.

सध्या राज्यात नव्या राजकीय गणितांवर चर्चा सुरू आहे. विशेषतः भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना युतीसंदर्भात अनेक वेळा चर्चा ऐकायला मिळते. तसेच मनसेसोबत युती करण्याबाबत भाजपा नेत्यांनीही मागे प्रतिक्रिया दिल्या होत्या. पण अद्यापही यावर कोणताही ठोस निर्णय झालेला नाहीये. किंवा दोन्ही पक्षांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाहीये. परंतू, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे सातत्याने मनसेसोबतच्या युतीवर मत व्यक्त करत आहेत.

काही दिवसांपूर्वी राज ठाकरे आणि पाटील यांची भेट झाली होती. त्यानंतर भाजप आणि मनसे युतीच्या चर्चांना उधाण आले. याबद्दल राज यांनी गेल्या आठवड्यात पत्रकार परिषदेत मत व्यक्त केले. ते म्हणाले, ‘भूमिका स्पष्ट काय करायच्या, माझ्या भूमिका स्पष्ट आहेत. मी आतापर्यंत ज्या भूमिका मांडल्या आहेत त्या अगदी स्पष्ट आहेत. महाराष्ट्र हिताच्या भूमिका आहेत. त्यासोबतच देशहिताच्या सुद्धा भूमिका मांडल्या आहेत. प्रत्येक राज्याने आपआपली भूमिका कशी निभावली पाहिजे आणि काय काय केले पाहिजे.’

‘तुम्ही आमच्यावर आक्रमक केले नाही पाहिजे आणि आम्ही तुमच्यावर आक्रमण करत नाहीयेत. भूमिकांना विरोध आहे, व्यक्तींना विरोध नाही. माझा नरेंद्र मोदींना विरोध नाही आणि अमित शहांनाही नाहीये, वैयक्तिक देणघेणं नाहीये. ज्या भूमिका नाही पटल्या त्याचा विरोध केला आणि ज्या भूमिका पटल्या त्यांबाबत अभिनंदनही केलं आहे’ असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या