मोठी बातमी! महिलांच्या नावाने घर घेतल्यास मुद्रांक शुल्कात सवलत, अजित पवारांची घोषणा

मुंबई : अर्थमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२१-२२ आज विधानसभेत सादर केला. यावेळी त्यांनी विविध मोठ्या घोषणा केल्या. यातील महत्त्वाचा निर्णय म्हणजे महिलांच्या नावाने घर घेतल्यास मुद्रांक शुल्कात सवलत मिळणार आहे. १ एप्रिल २०२१ पासून याची अंमलबजावणी होणार असल्याचे ते म्हणाले.

दरम्यान, आज जागतिक महिला दिनानिमित्त त्यांनी राज्यातील तमाम स्त्रिया, मुलींना शुभेच्छा देऊन अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प मांडण्यासाठी सुरुवात केली. महाराष्ट्राच्या अर्थकारणात महिलांचा विशेष सहभाग असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

राज्यात कोरोना आणि लॉकडाउनच्या काळात कृषी क्षेत्रानेच अर्थव्यवस्थेला सावरल्याची कबुली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. तर, ३१ लाख २३ हजार शेतकऱ्यांना १९ हजार कोटी कर्ज थेट वर्ग केले गेले असल्याची माहिती देखील त्यांनी दिली. शेतकऱ्यांना सुलभरित्या कर्ज उपलब्ध करुन देण्यात आले. यंदा ४२ हजार कोटींचे पीक कर्जाचे वाटप करण्यात आले आहे.

उद्योग सेवा क्षेत्रात जरी घसरण झाली असली तर कृषी क्षेत्रात मात्र तब्बल ११ टक्के वाढ झाल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं आहे. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भरीव वाढ व्हावी म्हणूण प्रयत्न केले असल्याचं देखील सांगण्यात आलं आहे. तसेच, येत्या काळात देखील कृषी क्षेत्रासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. शेती क्षेत्रात आधुनिकरण आणण्यासाठी 4 कृषी विद्यापीठांना संशोधनासाठी दरवर्षी 200 कोटी देणार आहे. 4 कृषी विद्यापीठांना 3 वर्षात प्रत्येकी 600 कोटी संशोधनासाठी देणार असल्याचे अजित पवार यांनी जाहीर केले आहे.

महाविकास आघाडी सरकारचा हा दुसरा अर्थसंकल्प आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुपारी दोन वाजता विधानसभेत अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात केली. अर्थराज्यमंत्री शंभूराज देसाई हे विधान परिषदेत अर्थसंकल्प सादर करतील.

महत्त्वाच्या बातम्या : 

IMP