मोठी बातमी : अमली पदार्थ सेवन प्रकरणात भारती सिंहनंतर तिच्या पतीलाही अटक

भरती सिंह

मुंबई :  गेल्या 2 आठवड्यांपासून एनसीबीने मुंबईतल्या अंधेरी, वर्सोवा, घाटकोपर या भागात धाड सत्र सुरू केले आहे. यामध्ये बॉलिवूडशी संबंधित अनेकांची नावे समोर आल्याने त्यांना समन्स बजावण्यात आले आहेत. आता ड्रग प्रकरणात प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंह हिच्या अटकेनअतंर आता तिचा पती हर्ष लिंबाचिया याला देखील एनसीबीने (NCB) अटक केली आहे.

शनिवारी भारतीला अटक करण्यात आली होती. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून हर्ष लिंबाचिया याची जवळपास 18 तास चौकशी झाल्याची माहिती समोर येत आहे. एनसीबी अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली आहे. आज भारती आणि हर्ष दोघांनाही न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. एनसीबीने केलेल्या चौकशीमध्ये दोघांनीही अंमली पदार्थांचे सेवन केल्याचे कबुल केले आहे.

भारतीला एनडीपीएस अधिनियम 1986 नुसार अटक करण्यात आली आहे. भारतीचं घर आणि प्रॉडक्शन हाऊसमधून NCB नं शनिवारी सकाळी छापेमारी केली. दोन्ही ठिकाणाहून NCB च्या अधिकाऱ्यांनी 86.5 ग्रॅम गांजा मिळाला आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधले ड्रग्ज कनेक्शन समोर आले आहे. यानंतर एनसीबीने धडक कारवाई सुरू केली आहे.

 

महत्वाच्या बातम्या