अनिल राठोड यांच्या अकाली निधनाने शिवसेना पक्षाची मोठी हानी- अर्जुन खोतकर

khotkar

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- दिवंगत अनिल राठोड यांनी २५ वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून जनतेचे प्रश्‍न सोडविले. सामन्याचे प्रश्‍न सुटावे, त्यांना न्याय मिळवा, यासाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले. सर्वसामान्यांचा नेता, जनतेसाठी दिवस-रात्र झटणारा कार्यकर्ता, शिवसेनाचा सच्चा सैनिक अशी ख्याती असलेले स्व.अनिल राठोड यांनी आयुष्यभर जनतेची सेवा केली. त्यांची जनसेवेची ही कारकिर्द नगरकरांच्या व शिवसैनिकांच्या स्मरणात राहील.

अनिल राठोड यांच्या अकाली निधनाने शिवसेना पक्षाची मोठी हानी झाली असल्याचे मत माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी व्यक्त केले आहे. शिवसेना उपनेते, माजी मंत्री अनिल राठोड यांचे मागील काही महिन्यांपूर्वी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. अनिल राठोड हे अहमदनगर शहर विधानसभा मतदार संघातून सलग २५ वर्ष आमदार म्हणून निवडून आले होते. अहमदनगर जिल्ह्यात शिवसेना वाढविण्यात त्यांचा मोठा वाटा होता. स्व.अनिल राठोड यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांची माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी सांत्वनपर भेट घेतली.

अर्जुन खोतकर पुढे म्हणाले की, शिवसेना उपनेते, माजी मंत्री अनिल राठोड हे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक होते. त्यांच्या जाण्याने शिवसेना पक्षाचे खूप मोठे नुकसान झाले असून, त्यांच्या संपूर्ण कुटुंबीयांच्या मागे शिवसेना पक्ष खंबीरपणे उभा आहे. त्यांच्या जाण्याने अहमदनगर मधील शिवसेना पोरकी झाली आहे. त्यांचे कुटुंबीय व त्यांचे सर्व कार्यकर्ते यांच्यामागे शिवसेना खंबीरपणे उभी आहे, असे खोतकर म्हणाले.

अहमदनगर शहरातील अनेक शिवसैनिकांनी अर्जुन खोतकर यांच्यापुढे स्वर्गीय राठोड यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी शहरप्रमुख दिलीप सातपुते, संभाजी कदम, अभिषेक कळमकर, योगीराज गाडे, गणेश कवडे, दत्ता जाधव, संतोष गेनप्पा, दिपक खैरे, संजय शेंडगे, राम नळकांडे, निलेश भाकरे, अनिल बोरुडे, दत्ता कावरे, बाळासाहेब बोराटे, परेश लोखंडे, मुन्ना भिंगारदिवे, अभिषेक भोसले, डॉ.श्रीकांत चेमटे, दीपक कावळे, अशोक तुपे, अरुणा गोयल, प्रशांत भाले, सुमित धेंड, नरेश भालेराव, महेश शेळके आदींसह अनेक शिवसैनिक उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या-