भाऊसाहेब फुंडकर यांच्या जाण्याने सहकार क्षेत्राचे मोठे नुकसान – अजित पवार

नागपूर :  भाऊसाहेब फुंडकर यांच्या जाण्याने एका राजकीय पक्षाचे नुकसान झाले नसून त्यांच्या जाण्याने संपूर्ण सहकार क्षेत्राचे नुकसान झाले आहे. एक अजातशत्रू नेतृत्व काळाच्या पडदयाआड गेल्याचे उदगार विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत शोकप्रस्तावावर बोलताना काढत भाऊसाहेब फुंडकरांना आदरांजली वाहिली.

मागील अधिवेशनात याच सभागृहात भाऊसाहेब फुंडकरांनी शेतकऱ्यांना नुकसानभरपाई घोषित करुन शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला होता. भाऊसाहेबांनी भाजपला एक ग्रामीण चेहरा मिळवून दिला. त्यांनी अनेक पदे भूषवली आणि प्रत्येक पदाला न्याय देण्याचे काम केले. आणीबाणीच्या काळात त्यांनी तुरुंगवासही भोगला होता परंतु त्याचा गाजावाजा त्यांनी कधी केला नाही. त्यांच्या निधनानंतर काही गोष्टी चुकीच्या घडल्या. निधनानंतर दुखवटा व्यक्त केला नाही अशी खंतही अजित पवार यांनी व्यक्त केली.

पक्षाच्यावतीने आदरांजली वाहतानाच शेतकऱ्यांना न्याय देवून सरकारने भाऊसाहेबांना आदरांजली वाहवी असेही अजितदादा म्हणाले. अजितदादांनी शोकप्रस्तावामध्ये माजी मंत्री भाई वैदय, बापूराव पानघाटे,दगडू बडे यांनाही आदरांजली वाहिली.

You might also like
Comments
Loading...