भाजपला मोठी गळती, आयाराम पुन्हा घरवापसीच्या तयारीत

टीम महाराष्ट्र देशा : राज्यात भाजपमधील डझनभर आमदार पुन्हा महाविकास आघाडीच्या संपर्कात असल्याच्या चर्चांना राजकीय वर्तुळात उधान आले आहे. याशिवाय भाजपाचे राज्यसभा खासदार देखील नाराज असल्यामुळे तेही महाविकास आघाडीच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे भाजपला गळती लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

राज्यात ओबीसी नेत्यांना डावलण्यात आले असल्याचा आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे. तसेच विधानसभा निवडणुकीत माजी मंत्री विनोद तावडे, चंद्रकांत बावनकुळे यांसारख्या अनुभवी नेत्यांना तिकीट डावलण्यात आले. तर ज्या ओबीसी नेत्यांना तिकीट देण्यात आले होते त्यांच्या पराभवालाही भाजपच कारणीभूत असल्याचा आरोपही एकनाथ खडसे यांनी केला आहे. तसेच पक्षाच्या भूमिकांवर पंकजा मुंडे नाराज असल्याच्या चर्चांनाही यावेळी त्यांनी दुजोरा दिला.

Loading...

तसेच, हिवाळी अधिवेशन झाल्यानंतर पक्षात पुन्हा येणाऱ्या नेत्यांबाबत विचार केला जाईल. असे महाविकास आघाडीडून सांगण्यात आले आहे. ज्या नेत्यांना पुन्हा पक्षात यायचे आहे, त्यांच्याबाबत स्थनिक नेत्यांना विश्वासात घेऊन घरवापसी करणाऱ्या नेत्यांबाबत पुढील निर्णय घेतला जाईल. अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी दिली आहे.

तर, भाजपचे प्रवक्ते आशिष शेलार यांनी थोरात यांचा दावा फेटाळून लावत भाजप आमदार पक्ष सोडणार नाहीत. भीतीपोटी आमदार पक्ष सोडण्याच्या चर्चा या फक्त अफवाच आहेत. या चोराच्या उलट्या बोंबा असल्याचे शेलार यांनी सांगितले आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

'नवे रुग्ण न आढळल्यास 'हे' राज्य '७ एप्रिल'पर्यंत कोरोनामुक्त होण्याची शक्यता'
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
कोरोनाविरोधात लढण्यासाठी रिलायंस कंपनीने घेतला 'मोठा' निर्णय; केली तब्बल 'इतक्या' कोटींची मदत
#Corona : कनिका कपूरचा चौथा रिपोर्टही पॉझिटीव्ह, इंस्टा अकाऊंटवरून केली भावनिक पोस्ट
दारुड्यांसाठी अत्यंत वाईट बातमी...दुकाने सुरु होण्यासाठी पहावी लागणार आणखी वाट
सावधान ! कोरोनाचे नवे केंद्र झोपडपट्टीत, अनेकजण सापडले कोरोनाबाधित
कोरोना ( कोव्हिड-१९ ) संसर्गाची भिती कोणाला ?
'धन्यवाद अजित पवार! शेवटी अनुभवाचं महत्व तुम्ही दाखवून दिलं; बाकीचे फेसबुक लाईव्हमध्ये व्यस्त'
महाराष्ट्रातील ‘या’ शहरात वाढला कोरोनाग्रस्तांचा झपाट्याने आकडा, सात महिन्यांच्या बाळाचाही समावेश
‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?