फडणवीसांच्या सहमतीनं हजारो कोटींचा जमिन घोटाळा – काँग्रेस

cm devendra fadanvis

मुंबई – नवी मुंबईतील सिडकोमधील जमिनीच्या व्यवहारावरून काँग्रेसने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. सिडकोमधील १७६७ कोटी रुपये किमतीच्या 24 एकर जमिनीची अवघ्या तीन कोटी रुपयांना व्यवहार झाल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. या घोटाळ्यामुळे मंत्रालयातील काही मंत्री आणि बड्या अधिकाऱ्यांचा सहभाग असून, हा घोटाळा झाल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.

Loading...

सगळे कायदे धाब्यावर बसवत नावांमध्ये बदल करणे, पॉवर ऑफ अॅटर्नी देणं, सर्वे या सगळ्या गोष्टी एका दिवसांत म्हणजेच अवघ्या २४ तासांमध्ये उरकण्यात आल्या. सिडको अथवा कुठल्याही सरकारी यंत्रणेने विरोध तर केलाच नाही उलट बेकायदेशीर कृत्य करण्यात सहाय्य केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. या सगळ्या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हावी अशी मागणी काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण, रणजीत सुरजेवाला व संजय निरुपम यांनी केली आहे.

पत्रकार परिषदेतील प्रमुख मुद्दे

  • १७६७ कोटींचा भूखंड अवघ्या तीन कोटी रुपयांना व्यवहार
  • सर्वे नंबर 183/CD, रांजनपाडा, खारघर येथील जमिनीचा व्यवहार
  • एकाच दिवसात सर्वे, भूसंपादन आणि हस्तांतरण झाले
  • सिडकोची जमीन असूनही, तहसीलदारांकडून हस्तांतरण
  •  सिकडोकडून त्यावर आक्षेपही घेण्यात आला नाही
  • दीड वर्ष लागणारे व्यवहार एका दिवसात पूर्ण झाले
  • सिडको-नगरविकास आणि बिल्डर यांचे साटेलोटे
  • मनीष भतिजा, संजय भालेराव यांच्या नावाने जमिनीची खरेदी विक्री
  • व्यवहारात प्रसाद लाड यांचाही सहभागLoading…


Loading…

Loading...