राज्यात शेती व पायाभूत सुविधांमध्ये मोठी गुंतवणूक – देवेंद्र फडणवीस

The Prime Minister, Shri Narendra Modi chairing the fourth meeting of the Governing Council of NITI Aayog, in New Delhi on June 17, 2018.

महाराष्ट्रात शेती आणि पायाभूत सुविधा क्षेत्रात मोठी गुंतवणूक झाली. परिणामी, राज्याच्या सकल देशांतर्गत उत्पादनात (जीएसडीपी) वाढ होऊन 2014-15 पासून हा दर 8.3 टक्क्यांपर्यंत आला आहे. सोबतच राज्यात संरक्षण, अंतराळ, लॉजिस्टिक, फिनटेक, अनिमेशन, रोबोटिक्स आणि आर्टिफिशियल इंटिलिजन्स यासारख्या अनेक नवीन धोरणांना आकार देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

ई-नाम, मृदा आरोग्य कार्ड, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, प्रधानमंत्री पीक विमा योजना आदिंसह केंद्र शासनाच्या महत्त्वपूर्ण कार्यक्रमांमुळे राज्यातील शेतीक्षेत्रात सकारात्मक बदल घडून आल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील आरोग्य क्षेत्रातील प्रगती, नीती आयोगाकडून निवड झालेल्या महत्त्वाकांक्षी जिल्ह्यांच्या विकासासाठी उचलण्यात आलेली पाऊले, उद्योग, पायाभूत सुविधा, पर्यावरण व शिक्षण क्षेत्रातील राज्याची प्रगती व राज्य शासनाने राबविलेल्या विविध उपक्रम या विषयी त्यांनी माहिती दिली. महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती वर्षानिमित्त राज्यात राबविण्यात येणार असलेल्या विविध कार्यक्रमांची माहितीही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी दिली.