fbpx

धक्काक्दायक बातमी : देशात बेरोजगारीच्या टक्केवारीत मोठी वाढ

टीम महाराष्ट्र देशा : सेंटर फाॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीने (CMIE) जाहीर केलेल्या आकडेवारीमुळे तरुणांमध्ये निराशेचं वातावरण पसरलं आहे. कारण त्यांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार एप्रिल महिन्यात देशात बेरोजगारीचा दर ७.६ टक्के इतका वाढला आहे.

सेंटर फाॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीचे प्रमुख महेश व्यास यांनी आकडेवारी जाहीर केली. एप्रिल महिन्यात देशात बेरोजगारीचा दर ७.६ टक्के इतका वाढलेला दर हा ऑक्टोबर २०१६ नंतरचा हा सर्वात मोठा दर आहे. हाच दर मार्चमध्ये ६.७१ टक्के इतका होता.

वाढती बेरोजगारी ही आज देशापुढील सगळ्यात मोठी समस्या आहे. सरकार यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्नशील आहे. परंतु वाढत्या लोकसंखेचा विचार करता बेरोजगारीच्या दरात होणारी वाढ ही स्वाभाविक आहे.