नुकसानग्रस्त रायगड जिल्ह्याला ठाकरे सरकारची मोठी मदत

Uddhav Thackeray

अलिबाग : दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीतील रायगड जिल्ह्याला निसर्ग चक्रीवादळाचा मोठा तडाखा बसला. या चक्रीवादळात अनेक नागरिकांच्या घरांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त भागाची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाहणी केली. या पाहणी नंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रायगड जिल्ह्यासाठी तात्काळ १०० कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे.

कमाईमध्ये घसरण होऊन देखील अक्षयने पटकावले जगातील श्रीमंत सेलिब्रिटींच्या यादीमध्ये नाव

द्धव ठाकरे रायगडमधील नुकसानाची पाहणी कऱण्यासाठी पोहोचले आहेत. पाहणी केल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ठाकरे म्हणाले,तातडीने जे काही करता येईल ते करण्यास सुरुवात केली आहे. पंचनाम्यांना आठ दहा दिवस लागतील. त्यानंतर नुकसानभरपाई सरकार देईलच पण तातडीने रायगड जिल्ह्यासाठी सरकारकडून 100 कोटी देत आहोत. याचा अर्थ 100 कोटींवर फूलस्टॉप आहे, असा नाही असं त्यांनी यावेळी सांगितले.

पुढे बोलताना ठाकरे म्हणाले, “जशी रायगडसाठी घोषणा केली, तसंच इतर जिल्ह्यांमध्ये नुकसान झालं, त्यानुसार काळजी घेणार आहोत,” असं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. “मी आज तातडीने रायगडला आलो, ते इथल्या लोकांचं कौतुक करायला. सरकारला मदत केल्याबद्दल धन्यवाद करायला आलो,” असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

‘प्रस्तावित वीज (सुधारणा) विधेयक बिल 2020 मुळे घटनेवर घाला घालून संघराज्य रचनेला सुरुंग लावण्याचा प्रयत्न’

अनेक ठिकाणी पडझड झाली, त्याची साफसफाई करावी लागेल. पालापाचोळा कुजेल, एखादं जनावर मेलं असेल तर ते सडण्याची शक्यता आहे. त्यामधून पुन्हा रोगराई वाढेल, त्यामुळे साफसफाई करावी लागणार आहे. वीजपुरवठा, मोबाईल सेवा पूर्ववत करायचा आहे. घरांची पडझड झाली आहे, ही कामं प्राधान्याने करत आहोत असं त्यांनी सांगितलं.