मोठी बातमी : ‘या’ दिवसापासून चित्रपटगृह उघडण्यास परवानगी

Cinema-halls-reopening

कोलकाता : कोरोना व्हायरस लॉकडाऊनमुळे बंद असलेले चित्रपटगृह तसंच ओपन थिएटर सुरू करण्याची परवानगी पश्चिम बंगालमध्ये देण्यात आली आहे. 1 ऑक्टोबरपासून राज्यातील चित्रपटगृह कमी लोकांना प्रवेश देऊन अटी व शर्थींसह सुरू करता येतील, अशी घोषणा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली.

कोरोना व्हायरस लॉकडाऊननंतर देशभरातील चित्रपटगृह आणि खुले थिएटर बंद होते. अनलॉकच्या विविध टप्प्यांनंतरही ही ठिकाणं सुरू झालेली नाहीत. राज्यांनी परिस्थिती पाहून याबाबत निर्णय घ्यावा, अशी सूचना केंद्रीय गृहमंत्रालयाने दिली होती. त्यात पश्चिम बंगालने बाजी मारली असून चित्रपटगृह आणि ओपन थिएटर सुरू करण्याचा निर्णय सर्वप्रथम याच राज्यात घेण्यात आला आहे.

नॉर्मल आयुष्याकडे परतण्यासाठी जत्रा, नाटकं, सिनेमा, संगीत तसंच जादुच्या प्रयोगांसारखे कार्यक्रम 1 ऑक्टोबरपासून सुरू करता येतील. यामध्ये 50 लोकांनाच उपस्थित राहण्याची परवानगी मिळेल. यादरम्यान, सोशल डिस्टन्सिंग, मास्क व इतर खबरदारी घेणं बंधनकारक असेल, असं ममता बॅनर्जी यांनी ट्वीट करून सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या