मराठवाड्यातील शाळांच्या विकासासाठी ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; शिक्षणमंत्र्यांची माहिती

मराठवाड्यातील शाळांच्या विकासासाठी ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; शिक्षणमंत्र्यांची माहिती

Varsha Gaikwad

मुंबई : राज्यातील शाळांची स्थिती सुधारण्यासाठी ठाकरे सरकारने मोठा आणि अत्यंत महत्वाचा निर्णय घेतला आहे. स्वराज्यजननी, माँसाहेब जिजाऊ यांच्या विचारांतून प्रेरणा घेत ‘राजमाता जिजाऊ शैक्षणिक गुणवत्ता विकास अभियान’ हा उपक्रम आम्ही सुरू करत आहोत, असं म्हणत राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ही योजना प्रामुख्याने मराठवाड्यातील शाळांसाठी असल्याचंही वर्षा गायकवाड यांनी सांगितलं आहे. याबाबत त्यांनी ट्विटरवरुन माहिती दिली आहे.

विद्यार्थ्यांसाठी पायाभूत सुविधा उपलब्ध असणे ही चांगल्या शाळेची ओळख आहे आणि ते पुरविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. स्वराज्यजननी, माँसाहेब जिजाऊ यांच्या विचारांतून प्रेरणा घेत ‘राजमाता जिजाऊ शैक्षणिक गुणवत्ता विकास अभियान’ हा उपक्रम आम्ही सुरू करत आहोत. अभियनांतर्गत मोडकळीस आलेल्या निजामकालीन शाळांच्या पुनर्बांधणी आणि दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. अभियानाच्या पहिल्या टप्प्यात मराठवाड्यातील ७१८  शाळेमधील १६२३ वर्गखोल्यांची पुनर्बांधणी तसेच १०१५ शाळांच्या दुरुस्तीची कामे हाती घेत आहोत, अशीही माहिती शिक्षणमंत्री गायकवाड यांनी दिली आहे.

दरम्यान, या ‘राजमाता जिजाऊ शैक्षणिक गुणवत्ता विकास अभियान’ उपक्रमासाठी राज्य शासनाने २०० कोटी रुपये इतक्या खर्चास मान्यता दिली आहे. पुढील टप्प्यात राज्यातील इतर विभागातही या उपक्रमाचा विस्तार करण्यात येईल. यापैकी ८० टक्के रक्कम राज्य सरकार, १० टक्के रक्कम जिल्हा परिषद व उर्वरित १० टक्के रक्कम संबंधित शाळा व्यवस्थापन समितीकडे लोकवर्गीतून किंवा सीएसआर फंडातून उभी केली जाणार आहे. या उपक्रमाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळेल,अशी मला आशा आहे, अशी आशा वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या