भारतात होणाऱ्या विश्वचषकात सहभागी होणाऱ्या संघाबाबत आयसीसीचा घेणार मोठा निर्णय?

मुंबई : येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भारतात टी-२० विश्वचषक स्पर्धा आयोजीत करण्यात आली आहे. कोरोनाच्या सावटामुळे या स्पर्धेवर अनिश्चीततेचे सावट आहे. यादरम्यान भारतात होणाऱ्या २०१३ सालच्या ५० षटकाच्या विश्वचषकासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजे आयसीसी मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे.

२०२३ साली होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेत १० ऐवजी १४ संघ खेळवण्याचा विचार सुरु आहे. आयसीसीच्या सदस्यानी दिलेल्या माहितीनुसार १६ संघ सहभागी करण्यावर चर्चा सुरु होती. मात्र १४ संघाच्या सहभागावर सर्वांनी संमती दर्शवली असल्याची माहिती समोर आली आहे. यापुर्वी झालेल्या २००३, २०११ आणि २०१५ विश्वचषकात १४ संघात स्पर्धा झाली होती. तर २०१९ साली झालेल्या स्पर्धेत २०१९ केवळ १० संघ सहभागी झाले होते.

काही सदस्यांची मागणी होती की २००७ प्रमाणे १६ संघाना संधी देण्यात यावी, मात्र त्याबाबत एकमत झाले नाही. विश्वचषक क्रिकेट स्पर्धेची सुरुवात १९७५ झाली झाली. या स्पर्धेला क्रिकेट मधील सर्वात महत्त्वाची स्पर्धा मानले जाते. विश्वचषक इतिहासात ऑस्ट्रेलियाने १९८७, १९९९, २००३, २००७ आणि २०१५ साली ही स्पर्धा जिंकली आहे. तर वेस्ट इंडिज (१९७५, १९७९) व भारत (१९८३, २०११) यांचा क्रमांक येतो. तर २०१९ विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडने न्यूझीलंडचा पराभव करत पहिल्यांदाच जेतेपदावर आपले नाव कोरले होते.

महत्वाच्या बातम्या